Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

himachal pradesh bus accident news today : हिमाचल प्रदेशात भीषण अपघात झाला. खासगी बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. शिमलाहून ही बस कुपवीकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
हिमाचल प्रदेशात भीषण अपघात, खासगी बस दरीत कोसळली, आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू
Himachal Pradesh Eight people died in a bus accident after a private bus enroute from Kupvi to Shimla rolled down the road near Haripurdhar in Sirmaur district ANI
Published On

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्याच्या हरिपुरधार येथे खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. जखमींना दरीतून बाहेर काढले जात आहे. अपघातग्रस्त बस शिमला येथून कुपवीकडे जात होती. हरिपुरधारमध्ये ही बस आली असता नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये पन्नास ते साठ प्रवासी होते.

बस अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले आहे. बसमधील जखमींना दरीतून बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. घटनास्थळी प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकायला येत असल्याचे सांगितले जात आहे.

सिरमौरचे पोलीस अधीक्षक निश्चिंत सिंह नेगी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिरमौर जिल्ह्याच्या हरिपुरधारजवळ कुपवीहून शिमला येथे जाणारी खासगी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या बसमध्ये अनेक प्रवासी होते. पोलीस आणि बचाव पथके जखमींना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.

हिमाचल प्रदेशात भीषण अपघात, खासगी बस दरीत कोसळली, आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू
Crime News : प्राध्यापकाचा किळसवाणा स्पर्श, क्लासमेटकडून रॅगिंग, धमकी; मनानं खचलेल्या विद्यार्थिनीनं तडफडून जीव सोडला

हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या पाच रुग्णांना उपचारासाठी संगडाह, ददाहू आणि नाहन येथील रुग्णालयांत नेण्यात आले आहे. या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. उद्योगमंत्री हर्षवर्धन चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.

हिमाचल प्रदेशात भीषण अपघात, खासगी बस दरीत कोसळली, आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू
Andhra Pradesh Accident Video : बाईकला वाचवताना भरधाव ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला, कारला धडकून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com