UP Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी उफाळली? माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

Uttar Pradesh Politics: योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांनी बंडाचे संकेत दिलेत. त्यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टची चर्चा होतेय.
Uttar Pradesh Politics:
Saam tv
Published On
Summary
  • योगी सरकारच्या विस्तारानंतर भाजपमध्ये खळबळ.

  • ब्रिज भूषण शरण सिंह यांच्या पोस्टची जोरदार चर्चा.

  • सोशल मीडिया पोस्टमुळे बंडाच्या चर्चांना उधाण.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळानंतर भाजपमध्ये खळबळ माजली आहे. भाजपचे माजी खासदार ब्रज भूषण शरण सिंह यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. 'शोहरत की बुलंदी भी पल भर का तमाशा है, जिस शाख पे बैठे हो वो टूट भी सकती है', या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तसेच अनेकजण या पोस्टचा वेगवेगळा अर्थ काढत आहेत.

Uttar Pradesh Politics:
BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

काहींच्या मते ही पोस्ट योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांनी बंडाचे संकेत दिलेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून ब्रजभूषण शरण सिंह हे नाराज असल्याचं म्हटलं जातंय. बृजभूषण शरण सिंह हे आपला मुलगा प्रतीक सिंह याला कॅबिनेट पद मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. जरी त्यांनी याला कधीही जाहीरपणे दुजोरा दिला नसला तरी, राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून अशा अटकळ लावली जात आहे.

Uttar Pradesh Politics:
Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

दरम्यान आज मंत्रिमंडळ विस्तारात ८ नेत्यांच्या नावाची चर्चा होतेय. यात ठाकूर समाजातील कोणत्याच नेत्याला संधी देण्यात आली नसल्याची चर्चा आहे. अशात बृजभूषण यांची ही पोस्ट व्हायरल झाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. यावेळी भाजप आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात जात आणि प्रदेश यांच्यात संतुलन साधण्याचे धोरण अवलंबले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मण, जाट, दलित, पासी, वाल्मिकी, लोधी आणि अत्यंत मागासलेल्या वर्गातील नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यावर पक्षाचे लक्ष केंद्रित आहे. सूत्रांनुसार, योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण आठ मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. यात सहा नवीन चेहऱ्यांचा समावेश असेल, तर दोन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये पदोन्नती दिली जाऊ शकते किंवा स्वतंत्र कार्यभार दिला जाऊ शकतो. २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समीकरणे संतुलित करण्यासाठी भाजपकडून हा विस्तार एक प्रमुख रणनीती म्हणून पाहिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com