Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय

Pahalgam Terror Attack News : भारताने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवला आणि अटारी-वाघा बॉर्डर बंद केली आहे.
Pahalgam Terror
Pahalgam Terror Attack NewsSaam tv
Published On

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. पहलगाममध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाल्यानंतर परराष्ट्रीय मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी महत्वाचे ५ मोठे निर्णय घेतले.

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत ५ निर्णयाविषयी माहिती दिली., 'पाकिस्तानी दुतवासांना ४८ तासांत देश सोडण्याचे दिले आहेत. सार्क व्हिसा असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधू पाणी करार देखील थांबवण्यात आल्याची माहिती मिस्त्री यांनी दिली.

Pahalgam Terror
Pahalgam Terror Attack : जिगरबाज काश्मिरी तरुण; हिंमतीने पुढे आला अन् हल्ल्यातील जखमीचा जीव वाचवला

काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेटची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासहित महत्वाचे अधिकारी सहभागी झाले. या बैठकीत पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा झाली.

Pahalgam Terror
Pahalgam Terror Attack : कुछ तो बडा होनेवाला है! सैन्यदलाला तयार राहण्याचे आदेश, वाचा स्पेशल रिपोर्ट

पहलगामच्या बैरसरन खौऱ्यात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर १७ पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी सकाळी सैन्य दल, पोलीस ते इतर एजन्सी सतर्क झाल्या. पहलगामवर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने लक्ष ठेवलं जात आहे. बैसरनच्या खौऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. या घटनेनंतर जम्मू काश्मीर ते दिल्लीपर्यंत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Pahalgam Terror
Pahalgam Terror Attack : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल; दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील कुटुंबाचा आधारवड हरपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com