
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 28 पर्यटकांचा जीव घेतल्यानंतर सरकारकडून कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची बैठक पार पडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगामधील घटनास्थळाची पाहणी करुन जखमींची विचारपूस केली. निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना अजिबात सोडले जाणार नाही, असं शाहंनी म्हटलं आहे. तर संरक्षणमंत्र्यांनीही दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिल जाईल, अशा इशारा दिलाय. 'दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो. पाकीस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण शिबीरांना लक्ष्य करु शकतो. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थितीही अतिशय बिकट झाली आहे. दुसरीकडे भारताचे अमेरीका, रशियाबरोबरचे संबंध चांगले आहेत. दोन्ही राष्ट्रांनी या हल्ल्याच्या विरोधात भुमिका घेतलेली आहे. चीननेही पाकिस्तानची बाजू घेण्याऐवजी या हल्ल्याबाबत दुख: व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या टेरिफ वॉर नंतर चीनने भारताबाबत मवाळ भूमिका घेतलेली आहे. हे भारतासाठी जमेची बाजू आहे.
2019 मध्ये पुलवामामध्ये भारतीय जवानांची हत्या झाली होती. त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उध्वस्त केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कृतीकडे सगळ्याचं लक्ष आहे. 'भारत POKमध्ये हल्ला करु शकतं, असं आंतरराष्ट्रीय विषय तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत..सैन्याला अलर्ट मोडचा इशारा दिलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी कुछ तो बडा होनेवाला है एवढं नक्की
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.