Pahalgam Attack: काश्मीर हल्ल्यातील मृतांचे पार्थिव मुंबई विमान तळावर दाखल|VIDEO

Mumbai Airport: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नगरिकांपैकी महाराष्ट्राच्या 6 नागरिकांचा समावेश होता.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरन येथे पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात महाराष्ट्राच्या सहा जणांसह 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी आहेत. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा शिंपडला.

यामध्ये महाराष्ट्राचे जे नागरिक मृत्यू झाले आहे. त्यांचे पार्थिव आता विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व सहा जणांचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे.

विशेष विमानाने या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगर येथून मुंबईत आणले आहेत. आता अॅम्ब्यूलन्सद्वारे हे मृतदेह डोंबिवली आणि पुणे येथे घेऊन जाणार आहेत. मृतदेह घेऊन जाण्यासाठी दोन रुग्णवाहिका सध्या मुंबई कार्गो विमानतळावर दाखल झाल्या आहेत. एक शववाहिका पनवेल महापालिका आणि दुसरी शववाहिका डोंबिवली महापालिकेची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com