
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हिल स्टेशनवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. या भ्याड हल्ल्यात कानपूरच्या श्यामनगर येथील ड्रिमलँड अपार्टमेंट येथील रहिवासी शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. शुभम द्विवेदीच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूने हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शुभम त्याच्या पत्नीसोबत रेस्टोरेंटच्या बाहेर बसून पदार्थ खात असताना त्याला दहशतवाद्याने धर्म विचारला. तू हिंदू आहे की मुस्लीम... तू मुस्लीम असेल तर कलमा वाच. त्यानंतर शुभमने नाही म्हणून मान डोलावली. त्यानंतर दहशतवाद्याने ताबडतोब शुभमला गोळी झाडली. त्यानंतर त्याची बायको म्हणाली, माझ्यावरही गोळी झाडा. मात्र, त्यानंतर शुभमची बायको बेशुद्ध झाली.
शुभम आणि यशोदा नगरची राहणारी ऐशान्याचं दोन महिन्यापूर्वी म्हणजे १२ फेब्रवारी रोजी लग्न झालं होतं. ऐशान्या ही एका शाळेत नृत्य शिक्षिका आहे. लग्नानंतर पहिल्यांदा दोघे कुटुंबासोबत फिरायला गेले होते. त्यांचासोबत शुभमचे वडील डॉ. संजय द्विवेदी, आई सीमा द्विवेदी, बहीण आरती आणि तिचे दोन मुले होते. तसेच ऐशान्याचे आई-वडील देखील त्यांच्यासोबत होते.
शुभमचे वडील संजय द्विवेदी यांनी म्हटलं की, आम्ही सकाळी पहलगामला पोहोचलो. आम्ही हिल स्टेशनला खालीच थांबलो. शुभम त्याच्या पत्नीसोबत हिल स्टेशनर घोड्यावरुन सफारी केली जाते. त्या ठिकाणी दोघे गेले. त्याच ठिकाणी नेमकी घटना घडली'.
संजय यांनी पुढे सांगितलं की, 'आधीच एकटाच दहशतवादी तिकडे पोहोचला. त्यानंतर एक-एक करत सर्व दहशतवादी तिथे पोहोचले. त्यानंतर या दहशतवाद्यांनी अनेकांवर गोळ्या झाडल्या'. दरम्यान, या गोळीबाराची माहिती सायंकाळी साडे सहा वाजता समजली' शुभमच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. द्विवेदीचे कुटुंब काश्मीरची सहल करून २३ एप्रिल रोजी परतणार होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.