सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan ) चांगलेच चर्चेत आहे. पवन कल्याण यांच्या पत्नीने अण्णा लेझनेवाने (Anna lezhneva ) मुंडन केले आहे. अलिकडेचा पवन कल्याणचा मुलगा मार्क शंकर सिंगापूरमधील त्यांच्या शाळेत लागलेल्या आगीत अडकला होता. ज्यात त्याला दुखापत झाली होती. तो ठीक झाल्यावर पवन कल्याण यांच्या बायकोने तिरुमला तिरुपती मंदिरात मुंडन करण्याचा नवस केला होता.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे एक उत्तम अभिनेते देखील आहेत. पवन कल्याण यांच्या बायकोने अण्णा लेझनेवा यांनी त्यांचा मुलगा मार्क शंकर गेल्या आठवड्यात सिंगापूरमधील शाळेत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतून वाचल्यानंतर तिरुमला तिरुपती मंदिरात त्यांचे केस दान करण्याचा नवस केला होता. जो त्याने आता पूर्ण केला आहे. अण्णा लेझनेवा यांनी रविवारी तिरुमला तिरुपती मंदिराला भेट दिली. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अण्णा लेझनेवा यांनी पद्मावती कल्याण कट्टा येथे आपले केस अर्पण केले. अण्णा एक रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन यांनी गायत्री सदन येथे मंदिर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आणि मंदिराला भेट देण्यापूर्वी आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेण्यापूर्वी परमेश्वरावरील विश्वासाची पुष्टी केली. नंतर त्यांनी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरातही भेट दिली.
मीडिया रिपोर्टनुसार, मार्कला हात आणि फुफ्फुसांना दुखापत झाली आहे. सिंगापूर येथील स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 13 एप्रिलला पवन कल्याण यांचे कुटुंब हैदराबादला परतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.