Tirupati Balaji : बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी, धक्कादायक दावा

Chandrababu Naidu News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. चंद्राबाबू यांच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशमधील राजकारण तापले आहे.
Tirupati Balaji
Tirupati Balaji Temple Saam tv
Published On

Tirumala Tirupati Balaji News : बालाजी मंदिरातील लाडूमधे तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरल्याचा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने बालाजी मंदिरातील लाडूमधे तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरली, असा गंभीर आरोप

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. चंद्राबाबू यांच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशमधील राजकारण तापले आहे.

लाडूमधे तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरली. मागील ५ वर्षांत YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. 'अन्नदानम' (मोफत जेवण) च्या गुणवत्तेशी YSR काँग्रेसने तडजोड केली, असा आरोप चंद्रबाबू यानी केला आहे. तर चंद्राबाबू यांनी हिंदू समजाच्या भावनांना ठेच पोहोचल्याचा YSR नेत्याचा आरोप

लाडूमधे तूपाऐवजी जनावरांची चरबी

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगनमोहन रेड्डी सरकारवर गंभीर आरोप केला. तिरुपती बालाजीच्या प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा वापर केला जात असल्याचे सांगितले. प्रसादामध्ये खरे तूप, स्वच्छता आणि उत्तम दर्जा लक्षात ठेवला जाईल, असेही यावेली चंद्राबाबू नायडू म्हणाले.

YSRCP कडून पलटवार -

जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCP कडून चंद्राबाबूंचा आरोप खोडून काढला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी हिंदू समजाच्या भावनांना ठेच पोहोचल्याचा आरोप YSR कडून करण्यात आला. भाविकांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझे कुटुंब तिरुमला प्रसादच्या बाबतीत शपथ घेण्यास तयार आहोत. चंद्राबाबूही कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का? असा सवाल जगनमोहन रेड्डी यांनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com