Operation Sindoor: अर्ध्या रात्री आमच्यावर हल्ला, भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा झळफळाट

Pahalgam Attack: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानात घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांसह मीडियाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
Operation Sindoor: अर्ध्या रात्री आमच्यावर हल्ला, भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा झळफळाट
Operation SindoorSaam Tv
Published On

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारताने घेतला. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानामध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील ९ दहशतादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानी मीडिययाची यावर आता प्रतिक्रिया आल्या आहेत. 'अर्ध्या रात्री आमच्यावर हल्ला.', अशाप्रकारच्या प्रतिक्रिया पाकिस्तानी मीडियावर दिल्या जात आहेत.

पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (ISPR) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, 'भारताने मध्यरात्री कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भ्याड हल्ले केले.' डीजी चौधरी यांनी पहाटे १.०६ वाजता एआरवाय न्यूजला सांगितले की, 'काही काळापूर्वी भ्याड शत्रू भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानल्लाह मशीद, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन ठिकाणी हवाई हल्ले केले.'

Operation Sindoor: अर्ध्या रात्री आमच्यावर हल्ला, भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा झळफळाट
Operation Sindoor Air Strike : "जय हिंद की सेना …", रितेश देशमुख ते अनुपम खेर 'ऑपरेशन सिंदूर'वर बॉलिवूड काय म्हणाले?

डीजी चौधरी यांनी पुढे सांगितले की, 'हा भ्याड आणि लज्जास्पद हल्ला भारताच्या हवाई हद्दीतून करण्यात आला. पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी यावर प्रतिक्रिया देईल. या घृणास्पद हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल.' पाकिस्तानी वृत्तसंस्था जिओ न्यूजने ऑपरेशन सिंदूरला भारताची आक्रमक आणि चिथावणीखोर कारवाई म्हणून वर्णन केले. भारताने तीन ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत आणि पाकिस्तान याला योग्य उत्तर देईल.', असे या वाहिनीने म्हटले आहे. पाकिस्तानी मीडियाने भारताने केलेल्या या हल्ल्यांना पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला म्हटले आहे.

Operation Sindoor: अर्ध्या रात्री आमच्यावर हल्ला, भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा झळफळाट
Operation Sindoor: हिंदूंना बायकोसमोर गोळ्या झाडल्या,भारताने दिलं चोख प्रत्युत्तर; पाकिस्तानवरच्या हल्ल्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' नाव का निवडलं?

दरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एआरवाय न्यूजला सांगितले की, 'भारताना पाकिस्तानातील रहिवासी भागांवर हल्ला केला. भारताने त्यांच्या हवाई हद्दीतून हल्ला केला आहे. त्यांनी त्यांच्या सीमेवरून हल्ला केला. त्यांना बाहेर येऊ द्या आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ.' दरम्यान, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे मध्यरात्री दीड वाजता भारताच्या सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेलेत.

Operation Sindoor: अर्ध्या रात्री आमच्यावर हल्ला, भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा झळफळाट
Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर 'असे' पडले मिसाईल्स! भारताच्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com