India-Pakistan War : भारताचा पाकिस्तानवर हल्ला? भारत-पाकिस्तान युद्ध सुरू? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

India-Pakistan War Viral Video : भारत-पाकिस्तान तणाव वाढत असतानाच आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. बॉम्ब हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय, आणि हा हल्ला भारताने केल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय.
India-Pakistan War Viral Video
India-Pakistan War Viral Video Saam Tv News
Published On

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. या व्हिडिओत एकामागोमाग एक असे बॉम्बहल्ल्याचा आवाज येतोय. त्यामुळे खरंच भारताने पाकिस्तानवर हल्ला केलाय का? युद्ध सुरू झालंय का? या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचा दावा करण्यात आलाय. बॉम्ब हल्ला होताच नागरिकांची पळापळ सुरू असल्याचं दिसतंय. एकामागोमाग एक असे बॉम्ब हल्ले होत असल्याने जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावतायत. हा हल्ला भारताने पाकिस्तानवर केल्याचा दावा करण्यात आलाय.

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असतानाच आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. ब़ॉम्ब हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय, आणि हा हल्ला भारताने केल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय. या हल्ल्यावेळी पाकिस्तानी नागरिक जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचा दावा केलाय. मात्र, भारताने खरंच पाकिस्तानवर हल्ला केलाय का? हा व्हिडिओ आताचा आहे का? या व्हायरल व्हिडिओची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

India-Pakistan War Viral Video
Chhatrapati Sambhajinagar : एका लग्नाच्या फजितीची गोष्ट, पावसाने दैना केली, नवरदेव नवरीला वऱ्हाडींनी खांद्यावर उचलून नेलं

व्हायरल मेसेज

भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील सियालकोटवर हल्ला केला. बॉम्ब हल्ला केल्यानं सियालकोटमध्ये दहशत पसरलीय. भारताच्या नावाने हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने याची आम्ही पडताळणी केली. हा व्हिडिओ कुठला आहे? कधीचा आहे याची आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तपासणी केली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहुयात.

व्हायरल सत्य

भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही

व्हायरल व्हिडिओ 9 नोव्हेंबर 2023 सालातील

व्हिडिओ उत्तर गाझा पट्टीतील असल्याचं समोर

इंडोनेशियन रुग्णालयाभोवती इस्रायलींकडून कब्जा

India-Pakistan War Viral Video
Mumbai Best Bus : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! नागरिकांचा बेस्ट प्रवास महागला, भाडे दुप्पटीने वाढले; जाणून घ्या नवीन दर

पाकिस्तानी सैन्य स्वतः जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. गेल्या १०-१२ दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जातंय. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलंय. मात्र, भारताच्या नावाने व्हायरल होत असल्याचा व्हिडिओ जुना असून, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

India-Pakistan War Viral Video
Pahalgam Baisaran : मोठी बातमी! पहलगाममध्ये जिथे रक्तरंजित थरार, तिथेच आता...; सुरक्षा दलांकडून हायअलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com