Mumbai Best Bus : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! नागरिकांचा बेस्ट प्रवास महागला, भाडे दुप्पटीने वाढले; जाणून घ्या नवीन दर

Mumbai Best Bus Ticket Rate : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बसभाड्यात या आठवड्यापासून दुप्पट वाढ होणार आहे. बेस्टनं किमान भाड्यात दुपटीनं वाढ केली आहे. साधारण बसचे किमान भाडे पाच रुपये आहे.
Mumbai BEST bus ticket Rate
Mumbai BEST bus ticket RateSaam Tv News
Published On

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली असून बस प्रवास आता महाग होणार आहे. बेस्ट बसच्या प्रवासभाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही भाडेवाढ ८ मे पासून लागू करण्यात येणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बसभाड्यात या आठवड्यापासून दुप्पट वाढ होणार आहे. बेस्टनं किमान भाड्यात दुपटीनं वाढ केली आहे. साधारण बसचे किमान भाडे पाच रुपये आहे. त्यात आता वाढ होऊन १० रुपये केलं आहे. तर एसी बसचं किमान भाडे सहा रुपये आहे ते १२ रुपये करण्यात आलं आहे.

Mumbai BEST bus ticket Rate
Pahalgam Baisaran : मोठी बातमी! पहलगाममध्ये जिथे रक्तरंजित थरार, तिथेच आता...; सुरक्षा दलांकडून हायअलर्ट

पाच किमीपर्यंतच्या अंतरासाठी आता १० रुपये मोजावे लागणार आहेत. १० किमी अंतरासाठी १५ रुपये, १५ किमी अंतरासाठी २० रुपये तर २० किमी अंतरासाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. हे तिकिट दर नॉन एसी बससाठी आहेत. एसी बससाठी तिकिटाचे दर वेगळे आहेत. त्यामध्ये पाच किमी अंतरासाठी आता १२ रुपये मोजावे लागणार आहेत. १० किमी अंतरासाठी २० रुपये, १५ किमी अंतरासाठी ३० रुपये तर २० किमी अंतरासाठी ३५ रुपये मोजावे लागणार आहेत. सवलतीचे दर यापेक्षा कमी असणार आहेत. मुंबई बेस्ट बसचं हे नवीन प्रवासभाडं ८ मे पासून लागू केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला मात्र जराशी झळ बसणार आहे.

Mumbai BEST bus ticket Rate
Thane News : ऐकलं का! ठाण्यात 'या' दिवशी पाणीबाणी, आधीच साठा करुन ठेवा; अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com