तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्गज नेत्याचा सत्ताधारी पक्षात प्रवेश; राजकारणात मोठा भूकंप

O Panneerselvam Joined DMK Before Tamil Nadu Elections: तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी सत्ताधारी द्रमुक पक्षात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Former Tamil Nadu Chief Minister O. Panneerselvam joins the ruling DMK, triggering major political developments ahead of state elections.
Former Tamil Nadu Chief Minister O. Panneerselvam joins the ruling DMK, triggering major political developments ahead of state elections.Saam Tv
Published On

निवडणुकीच्या आधीच तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम तथा AIADMK पक्षाचे नेते यांनी सत्ताधारी DMK पक्षात प्रवेश केला आहे. पन्नीरसेल्वम हे तीनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय होते. त्यांच्या आणि एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्यातील AIADMK मध्ये दीर्घकाळ चाललेल्या नेतृत्व संघर्षामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. राजकीय विश्लेषकांचा म्हणण्यांनुसार, पन्नीरसेल्वम यांच्या द्रमुकमध्ये प्रवेश केल्याने दक्षिण तामिळनाडूमधील मतपेढीवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच थेवर समुदायाचा त्यांना पाठिंबा असल्याने सत्ताधारी पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो.

द्रमुक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला

द्रमुक कार्यकर्ते अभिषेक यांनी पनीरसेल्वम यांच्या द्रमुकमध्ये प्रवेश केल्याने आनंद व्यक्त केला. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, हा एक अद्भुत दिवस आहे. लोक हे सिद्ध करत आहेत की आम्ही पुन्हा एक मजबूत सरकार स्थापन करणार आहोत. आम्ही आता मजबूत आहोत आणि आणखी मजबूत होऊ. त्यामुळे ओपीएस द्रमुकमध्ये सामील होण्याची शक्यता आहे असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच आमच्या नेतृत्व क्षमतेमुळे दुसरा माजी मुख्यमंत्री देखील आमच्या पक्षाच्या संपर्कात आहे, असे सुतोवाच त्यांनी केले आहे.

Former Tamil Nadu Chief Minister O. Panneerselvam joins the ruling DMK, triggering major political developments ahead of state elections.
Delhi liquor policy case: मी भ्रष्ट नाही... निर्दोष सुटका होताच माजी मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर, कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले, व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ

पन्नीरसेल्वम तीनवेळा होते तमिळनाडूचे मुख्यमंत्री

ओ. पन्नीरसेल्वम पहिल्यांदा २००१ मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अवघ्या सहा महिन्यांनंतर राजीनामा दिला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम केले, परंतु यावेळी त्यांनी केवळ एक महिना हे पद भूषवले. २०१६ मध्ये पन्नीरसेल्वम तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळीही २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com