Delhi liquor policy case: मी भ्रष्ट नाही... निर्दोष सुटका होताच माजी मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर, कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले, व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ

Arvind Kejriwal acquitted in Delhi excise policy case verdict: दिल्ली एक्साइज पॉलिसी प्रकरणात राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह २२ जणांची निर्दोष मुक्तता केली. निकालानंतर केजरीवाल भावनिक होत सत्याचा विजय झाल्याचं म्हणाले.
Arvind Kejriwal acquitted in Delhi excise policy case verdict
Arvind Kejriwal acquitted in Delhi excise policy case verdictsaam t
Published On

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी राऊज ॲव्हेन्यू कोर्टाकडून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण २२ जणांची यातून निर्दोष मुक्तता केलीये. या सुटकेनंतर अरविंद केजरीवाल मिडीयासमोर ढसाढसा रडले.

मीडियाशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, मी माझ्या आयुष्यात केवळ ईमानदारी कमावली आहे. भाजपाने माझ्यावर खोटे आरोप लगावले होतो. मात्र आज कोर्टाने सांगितलं की, केजरीवाल आणि सिसोदिया हे भ्रष्टाचारी नसून ईमानदार आहेत.

Arvind Kejriwal acquitted in Delhi excise policy case verdict
मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष, वाचा कोर्टात काय झालं?

मुक्तता होताच ढसाढसा रडले केजरीवाल

राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने निकाल देताच माजी मुख्यमंत्री केजरीवाल मिडीयासमोर आले. यावेळी त्यांनी, मी भ्रष्ट नाही. आज कोर्टानेच हे स्पष्ट करत मला इमानदार असल्याचं म्हटलंय.

आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला गेला

केजरीवाल यांनी पुढे सांगितलं की, भाजपा दीर्घकाळापासून मद्याचा घोटाळा-घोटाळा करत होती. मात्र ते खोटं असल्याचं आता समोर आलंय. आज सत्याचा विजय झाला आहे. मला पहिल्यापासूनच न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. माझ्या आम आदमी पक्षाला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Arvind Kejriwal acquitted in Delhi excise policy case verdict
Shocking : परीक्षेला जाण्याआधी १० वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, पेपरला जाणार इतक्यात भयंकर घडलं

अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला होता. त्यांनी आपच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात, पण मी भ्रष्टाचारी नाही, असं म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले.

Arvind Kejriwal acquitted in Delhi excise policy case verdict
Hair damage from colors: आता बिंधास्त खेळा होळी! केसांची काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिल्या सोप्या टीप्स

दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली एक्साइज पॉलिसी केसमध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलंय. २०२२ मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची नावं आरोपपत्रात दाखल करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com