मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष, वाचा कोर्टात काय झालं?

Delhi excise policy case : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केले. निकालानंतर कोर्टात भावनिक क्षण पाहायला मिळाले.
Latest news on Arvind Kejriwal
Latest news on Arvind KejriwalSaam TV marathi
Published On

Latest news on Arvind Kejriwal : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्या सरकारच्या काळातच या प्रकरणात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. कोर्टाने निर्दोष सुटका केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना कोर्टातच अश्रू अनावर आले. ते ढसाढसा रडले.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केले आहे. आम आदमी पक्षाच्या दोन्ही नेत्यांना त्यांच्याच सत्तेच्या काळात तुरूंगात टाकण्यात आले होते. दारू घोटाळा प्रकरणात केजरीवाल सरकारवर गंभीर आरोप कऱण्यात आले होते. त्यावेळी केजरीवाल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. राज्यात कोणताही दारू घोटाळा झालेला नाही, असे त्यावेळी केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले होते. पण त्यानंतरही केजरीवाल आणि सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. आता, राऊस अव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

Latest news on Arvind Kejriwal
Rinku Singh father death : रिंकू सिंगवर दु:खाचा डोंगर कोसळला, वडिलांचं निधन

नेमकं प्रकरण काय आहे?

अरविंद केजरीवाल सरकारने २०२१ मध्ये दिल्लीमध्ये नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. राज्याचा महसूल वाढेल असा दावा केला जात होता. पण या धोरणामुळे केजरीवाल सरकार अडचणीत आले होते. या धोरणाला वर्ष होण्याआधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढले. केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या अटकेनंतर हा वाद शिगेला पोहोचला होता. केजरीवाल आणि सिसोदिया यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपचा दिल्लीत पराभव झाला.

Latest news on Arvind Kejriwal
Pakistan Afghanistan conflict : ज्याची भीती होती तेच झालं, भारताच्या शेजारी युद्धाला सुरूवात

केजरीवाल-सिसोदिया निर्दोष मुक्त

उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मद्य परवाने वाटपात अनियमितता केल्याचा आरोप भाजपने केलेला होता. आपच्या या धोरणांमुळे निवडक व्यापाऱ्यांना फायदा झाला होता. जुलै २०२२ मध्ये आप आणि भाजपचा दिल्लीतील वाद अतिशय तीव्र झाला. उपराज्यपालांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणाचा अहवाल मागितला. अहवालाच्या आधारे केंद्रीय संस्थांनी तपास अधिक तीव्र केला. त्यानंतर केजरीवाल, सिसोदिया यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आले होते. पण आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केले आहे.

Latest news on Arvind Kejriwal
Pakistan Afghanistan conflict : तालिबानचा थरकाप उडवणारा प्रहार, पाकिस्तानचे JF-17 विमान पाडले, ५५ सैनिकांचा मृत्यू अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com