मोठी बातमी! राहुल गांधीच्या आंदोलनावर मोदी सरकारचं प्रत्युत्तर, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी केले गंभीर आरोप

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींच्या आंदोलनाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेस विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत असल्याचा गंभीर आरोप करत सरकार संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.
Dharmendra Pradhan
Dharmendra PradhanSaam TV Marathi
Published On

Dharmendra Pradhan Statement on Rahul Gandhi Protest : 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण भडकले आहे. राहुल गांधींसह काँग्रेस खासदारा, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान निवासाबाहेर मंगळवारी जोरदार आंदोलन केले. या निदर्शनांनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नाही. ते फक्त या संवेदनशील मुद्द्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विरोधक या विषयावर केवळ राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

Dharmendra Pradhan
Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

राहुल गांधींवर गंभीर आरोप

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी विद्यार्थ्यांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करत आहेत, असे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने थेट पंतप्रधानांच्या निवासाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आणि सुरक्षेच्या नियमांचेही उल्लंघन झाले. या विषयावर सविस्तर चर्चेसाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचा निरोप दिला असतानाही, काँग्रेसने लोकशाही मार्गाने चर्चा करण्याऐवजी राजकीय ड्रामा करणे पसंत केले. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता; केवळ बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहण्यासाठी गोंधळ घालणे हाच त्यांचा हेतू होता, असा गंभीर आरोप प्रधान यांनी केला.

Dharmendra Pradhan
धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

NEET च्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास तयार -

राहुल गांधींसाठी हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नसून चर्चेचे सर्व मार्ग खुले असतानाही फक्त वाद निर्माण करण्याचा आहे. आमचे सरकार NEET च्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास आणि तरुणांच्या प्रत्येक रास्त शंकेचे निरसन करण्यास १००% कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थी राजकीय प्रचारातील 'मोहरे' बनण्याच्या पात्रतेचे नाहीत; त्यांना अराजकतेऐवजी स्पष्टता, घोषणाबाजीऐवजी तोडगा आणि गोंधळाऐवजी जबाबदार वृत्ती हवी असे प्रधान म्हणाले.

विद्यार्थ्यांना फक्त संताप दाखवून चालणार नाही, तर आपल्याला त्यांना उत्तरे, सुधारणा आणि पारदर्शकता द्यावी लागेल. आमचे सरकार हेच देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com