Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra weather Update : आयएमडीने महाराष्ट्रातील पुढील ७२ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि इतर भागांसाठी ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALL
PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALLsaam tv
Published On

IMD Maharashtra weather forecast today : महाराष्ट्रात पुढील ७२ तास मुसळधार पावसाचे असणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकाच वेळी दोन चक्रीवादळ सदृश परिस्थिती (Cyclonic Circulation) निर्माण झाल्याने पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह तब्बल १० जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामानातील या मोठ्या बदलामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

तसेच कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. मुंबई आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात आणि समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील २४ तासांत पावसाचा प्रभाव वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALL
Exclusive : सिया-चेतनने ३१ मे पूर्वीच रचला डाव! केतन अग्रवाल हत्येच्या प्लॅनिंगची टाईमलाईन अखेर समोर, पाहा कट कसा शिजला?

आज पावसाचा कुठे कोणता अलर्ट?

रेड अलर्ट : पुणे घाटमाथा

ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

येलो अलर्ट : मुंबई, रत्नागिरी, पुणे, नाशिक, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे.

PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALL
Maharashtra Cabinet : तालुक्यांना ५ कोटींचा निधी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय, पुणे-नागपूरला सर्वाधिक फायदा

ढगाळ वातावरण आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि वाऱ्यांच्या चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे पावसाचा जोर वाढला आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आणि उत्तर छत्तीसगडच्या आकाशात चक्राकार वारे वाहत आहेत. त्याच वेळी, ईशान्य अरबी समुद्रापासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशावरून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दुहेरी हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com