Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

Myanmar News Today : म्यानमारमध्ये खाणकामासाठी ठेवलेल्या स्फोटकांच्या इमारतीत भीषण स्फोट होऊन ५५ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Myanmar News Today
Myanmar News TodaySaam TV Marathi
Published On

Myanmar explosion, Myanmar blast news : भारताशेजारी असणाऱ्या म्यानमारमध्ये अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली आहे. एका गावात झालेल्या शक्तिशाली स्फोटात ५५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा भयंकर होता की यामध्ये शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण म्यानमारमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतरचे भयावह आणि थरारक फोटो समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर १०० पेक्षा जास्त घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक (Rescue Team) घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कसा झाला आणि यामागे कोणाचा हात आहे का? याचा तपास स्थानिक सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

Myanmar News Today
Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

रविवारी ईशान्य म्यानमारमध्ये खाणकामासाठी लागणारी स्फोटके ठेवलेल्या एका इमारतीत अचानक स्फोट झाला. चीनच्या सीमेपासून ३ किमी नामखम टाउनशिपमधील काउंगटुप गावात हा स्फोट झाला. हा परिसर म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाखालील सरकारशी लढणाऱ्या ता'आंग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. स्फोटाचे कारण तात्काळ समजू शकले नाही. मात्र, त्या इमारतीत खाणकामासाठी वापरण्यात येणारी स्फोटके साठवलेली होती, असे सांगण्यात आले आहे.

Myanmar News Today
MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले
Myanmar News Today
LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com