'वंदे भारत'बाबत रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय, PM मोदींनी ट्रेनला दाखवला होता हिरवा झेंडा

Mumbai Ahmedabad Vande Bharat Train 20 Coach Update: मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने 16 ऐवजी 20 डबे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला असून प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express upgraded to a 20-coach train to accommodate rising passenger demand.
Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express upgraded to a 20-coach train to accommodate rising passenger demand.saam tv
Published On

रेल्वे मंत्रालयाने देशातील 42 व्या वंदे भारत एक्स्प्रेसला कायमस्वरूपी 20 डब्यांच्या ट्रेनमध्ये अपग्रेड केले आहे. या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च 2024 रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. या ट्रेनची देखभाल आणि संचालन पश्चिम रेल्वे झोनद्वारे केले जाते.

Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express upgraded to a 20-coach train to accommodate rising passenger demand.
Food Poisoning Case: पाणीपुरी ठरली जीवघेणी! 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 18 जण आजारी

प्रवासी क्षमतेत होणार मोठी वाढ

ट्रेन क्रमांक 22962/22961 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल- अहमदाबाद वंदे भारत ट्रेन 13 मार्च 2024 रोजी सुरू झाली होती, तेव्हा ती 16 डब्यांची होती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे जानेवारी 2026 मध्ये प्रायोगिक तत्वावर यामध्ये चार अतिरिक्त डबे जोडण्यात आले होते. ही तात्पुरती व्यवस्था मार्च आणि एप्रिल महिन्यातही सुरू राहिली. आता हे चार चेअर कार डबे कायमस्वरूपी जोडल्यामुळे ट्रेनची प्रवासी क्षमता 278 प्रवाशांनी वाढली आहे.

Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express upgraded to a 20-coach train to accommodate rising passenger demand.
राघव चड्ढांनी 'आप' सोडून भाजप का निवडला? त्यांच्याकडे कोणते ३ पर्याय होते? स्वतःच सांगितली इनसाइड स्टोरी

28 एप्रिलपासून होणार निर्णय लागू

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 22962/22961वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 ऐवजी 20 डबे करण्याची तात्पुरती व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात येत आहे. वाढवण्यात आलेल्या चार डब्यांमध्ये चारही चेअर कार डब्यांचा समावेश आहे.

Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express upgraded to a 20-coach train to accommodate rising passenger demand.
BJP CM: भारतात भाजपचे किती मुख्यमंत्री? एका क्लिकवर वाचा यादी

प्रवासाचा वेळ आणि वेळापत्रक

अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस 491 किमीचे अंतर 5 तास 40 मिनिटांत पूर्ण करते. ही ट्रेन रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावते.

प्रमुख थांबे

अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल दरम्यान ही ट्रेन चार स्थानकांवर थांबते.

वडोदरा

सूरत

वापी

बोरिवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com