Manasvi Choudhary
मागील अनेक दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात उन्हांचा पारा चांगलाच वाढला आहे.
कडाक्याच्या उन्हातून प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
उन्हातून प्रवास केल्यानंतर शरीरात डिहायड्रेशनची कमतरता जाणवते यामुळे थकवा, अस्वस्थता वाटते अशावेळी तुम्ही काय करावे? आणि काय टाळावे? हे जाणून घ्या.
दुपारी उन्हात बाहेर पडल्यानंतर शरीराचे तापमान देखील वाढते अशा परिस्थितीत तुम्ही आवश्यक असल्यास घराबाहेर पडा. अन्यथा १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
बाहेरून आल्यानंतर थेट लगेचच थंड पाणी पिणे टाळा.
कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यानंतर लगेच अंघोळ करणे टाळा.
उन्हातून आल्यानंतर कॉफी ,चहा आणि थंड पाणी पिणे टाळा यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.
उन्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते अशावेळी ते सामान्य करा.
कोमट पाण्याने चेहरा, हात आणि पाय स्वच्छ धुवा यामुळे उष्णता कमी होते.
उन्हातून घरी आल्यानंतर दही, फळे, सॅलड या थंड पदार्थाचे सेवन करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.