केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक, तुमच्या खिशावर परिणाम होणार?

E20 petrol :केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता देशात १ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक करण्यात आलं आहे.
 95 RON पेट्रोल
E20 petrolSaam tv
Published On
Summary

१ एप्रिलपासून E20 95 RON पेट्रोल बंधनकारक

२० टक्के इथेनॉल मिश्रणामुळे आयात खर्च कमी होण्यास मदत होणार

जुन्या वाहनांचे मायलेज ३-७% घटण्याची शक्यता आहे

केंद्र सरकारने इंधनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १ एप्रिलपासून केवळ २० टक्के इथेनॉल मिश्रीत आणि 95 IRON पेट्रोल विकणे बंधनकारक असणार आहे. आयात घटवणे आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने थेट परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.

 95 RON पेट्रोल
Ahilyanagar road Accident : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

95 रिसर्च ऑक्टोन नंबर (RON) पेट्रोलला साधारण प्रीमीयम किंवा हाय-ऑक्टोन पेट्रोल संबोधले जाते. ऑक्टोन नंबर जितका जास्त असेल, तितकं इंजिनमध्ये इंधन कमी कार्यक्षमतेने जळते. प्री-इग्निशनचा त्रास कमी होतो. 95 RON पेट्रोलमुळे सुरळीत गाडी चालवता येते.

पेट्रोलियम मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी स्पष्ट केलं आहे की, पेट्रोलियम कंपन्यांनी भारतीय मानक ब्युरोच्या मानकांनुसार, २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्री करावी लागणार आहे. त्यात RON 95 असेल. यामुळे देशभरातील पेट्रोलची गुणवत्ता एकसारखी होणार आहे.

 95 RON पेट्रोल
लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

सरकारने स्पष्ट केलं आहे की, काही विशिष्ट ठिकाणी सूट देण्यात आली आहे. इथेनॉल हे ऊस, मका या पिकांपासून बनवले जाते. इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल. यामुळे वाहनाचं उत्सर्जन देखील कमी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२३-२५ साली तयार झालेलं वाहन E20 म्हणजे इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या अनुषंगाने गाड्या तयार करण्यात आल्या होत्या. या पेट्रोलमुळे नव्या वाहनांना कोणतीही मोठी समस्या होणार नाही.परंतु जुन्या वाहनांचं ३ ते ७ टक्क्यांपर्यंत मायलेज कमी होईल.

 95 RON पेट्रोल
विधानसभेत खाणीचा मुद्दा गाजला; ठाकरे आणि राऊत सत्ताधाऱ्यांना भिडले, वनमंत्र्यांकडून एका वाक्यात उत्तर

95 RON इंजिनच्या सुरक्षेसाठी फायदेशीर

इंजिनचे नुकसान टाळण्यासाठी 95 RONच्या वापरावर भर दिला जात आहे. इंजिनमध्ये इंधन जळते, त्यावेळी 'नॉकिंग' होते. परंतु पिंगिंग सारखा आवाज येतो, त्यावेळी सर्वात जास्त इंजिनचं नुकसान होतं. त्यामुळे RON फायदेशीर ठरते. परंतु पेट्रोलच्या दराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com