National Highway New Toll Rules: हायवेवर टोल न भरल्यास होईल मोठं नुकसान; सरकारने केले कडक नियम, वाचा

National Highway New Toll Rules news : हायवेवर टोल न भरणाऱ्यांचं आता काही खरं नाही. कारण सरकारने आता कडक नियम केले आहेत.
Toll Tax Rule
Toll Tax RuleSaam tv
Published On
Summary

टोल न भरल्यास दुप्पट दंड आकारला जाणार आहे

ई-नोटीस सिस्टमद्वारे वाहनधारकांना दिली जाणार

नव्या नियमामुळे टोल व्यवहार अधिक पारदर्शक होणार

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या नियमात मोठे बदल केले आहेत. केंद्राने हायवे फी नियमात महत्वपूर्ण बदल केले आहेत. टोल नाक्यावरील व्यवहार पारदर्शक करण्यासाठी नियम कडक केले आहेत. नव्या नियमामुळे टोल नाक्यावरील गैरव्यवहार रोखण्यास मदत मिळेल, असा दावा केला जातोय. केंद्राच्या नव्या नियमानुसार, आता टोल चुकवणाऱ्या वाहनांच्या मालकांकडून दुप्पट टोल दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. केंद्राचा

Toll Tax Rule
गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई-पुणे हायवेवर अपघाताचा थरार; IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

केंद्राकडून आता आधुनिक ई-नोटीस सिस्टम लागू केली जाणार आहे. कोणतीही वाहनधारक टोल न देताच निघून गेला, तर वाहनाच्या मालकाला फोन किंवा इमेलवर ई-नोटीस पाठवण्यात येईल. या नोटीसमध्ये टोल चुकवल्याची तारीख, वेळ, ठिकाण आणि दंड अशी सर्व माहिती नमूद असेल. टोल नाक्यावर नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. ई-नोटीस मिळाल्यानंतर टोलचे पैसे दिले नाही, तर वाहनधारकांना दुप्पट टोल द्यावा लागेल.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम थेट वाहनांच्या डेटाबेसशी जोडला जाणार आहे. यावर आता बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. यामुळे शासनाला सर्व टोल नाक्याच्या व्यवहारावर लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे कोणत्या कारने टोल चुकवला, त्या वाहनाचा मालक कोण आहे, याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

Toll Tax Rule
मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; पुणे पोलिसांच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, नव्या नियमाने अनेक फायदे होतील. सर्वात आधी टोल नाक्यावरील व्यवहार पारदर्शक होईल. टोल वसुलीची प्रक्रिया सरळ सोपी होईल. गैरव्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल. सरकार देशात 'बॅरियर फ्री टोलिंग सिस्टम' आणू इच्छित आहे. यामुळे टोल नाक्यावर थांबायची गरज नाही. यामुळे थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे कमी केले जातील. टोल चुकवणाऱ्यांना नोटीस देऊन दंड आकारला जाईल. वाहनधारकांच्या वेळेची बचत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com