Operation Sindoor 2.0: पुन्हा मॉक ड्रिल होणार? ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी सुरु, पाकमधील 12 दहशतवादी तळ रडारवर

Blackout, Sirens & Bunkers: भारतानं ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी सुरु केलीय. आता देशात पुन्हा मॉक ड्रिल होणार आहे. मात्र भारतीय लष्करानं मॉक ड्रिलची घोषणा केल्यावर पाकिस्तान का घाबरलाय? मॉक ड्रिलमध्ये काय होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
international news
international news saam tv
Published On

ऑपरेशन सिंदूरपूर्वी देशात 244 ठिकाणी मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मॉक ड्रिलआधीचं भारतानं पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करत 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यावेळी 7 मे ते 10 मे पर्यंत पाकनं भारताच्या पश्चिमी सीमेजवळील राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे भारतानं पश्चिमी सीमेजवळील राज्यांमध्ये 29 मे रोजी पुन्हा मॉक ड्रिलची घोषणा केलीय. यात जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थानचा समावेश आहे. मात्र हे मॉक ड्रिल 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ची तयार आहे का? असाही प्रश्न निर्माण झालाय. मॉक ड्रिलमध्ये काय होणार? पाहूयात...

'मॉक ड्रिल'वेळी काय होणार?

हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजणार

कम्युनिटी बंकरच्या वापराबद्दल नागरिकांना ट्रेनिंग

मॉक ड्रिलदरम्यान ब्लॅक आऊट होणार

हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासन, सैन्य यांच्यातील समन्यवय तपासून पाहण्यासाठी मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आलीय. मात्र भारत ऑपरेशन सिंदूर 2.0 करण्याची शक्यता असल्यानं पाकचा थरकाप उडालाय. यावेळी भारताकडून पाकमधील 12 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यामुळे सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणेला सतर्क ठेवण्यात आलयं. त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून लष्कराने काश्मीरच्या 10 जिल्ह्यामध्ये नियंत्रण केंद्र उभारलेत. त्यामुळे ऑपरेशनसाठी भारत आता पूर्णपणे सज्ज झालाय.

भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाला तात्पुरता स्वल्पविराम देण्यात आला होता. त्यामुळे भारत- पाक संघर्षाला कधीही सुरुवात होऊ शकते. म्हणूनच दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कर आता सज्ज झालयं. मॉक ड्रिलच्या माध्यामातून भारत पाकिस्तानला, पीओकेतल्या दहशतवाद्यांना आणि जगाला इशारा देतोय की युद्धासाठी तैयार है हम...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com