Crime : स्कूल बसच्या ड्रायव्हरसाठी पत्नी बनली 'नागीण'; पतीचा काटा काढण्यासाठी रचला थरारक कट, कारण ऐकून संताप अनावर होईल

Meerut murder case, snake murder : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका शाळा संचालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली आहे. पती झोपेत असताना पलंगावर विषारी साप सोडून हत्या केल्याचा आरोप आहे.
Meerut wife kills husband with venomous snake
Meerut wife kills husband with venomous snake साम टीव्ही मराठी
Published On

Meerut wife kills husband with venomous snake : सात वर्षांपूर्वी झालेलं लव्ह मॅरेज, घरात हसती-खेळती दोन मुलं आणि स्वतःची शाळा... बाहेरून पाहणाऱ्याला हे सुखी कुटुंब वाटत होतं, पण याच घरातील बेडरूममध्ये गुरुवारी रात्री मृत्यूचा एक थरारक कट रचला गेला. मेरठच्या हस्तिनापूर भागात एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या अंथरुणावर चक्क जिवंत विषारी साप सोडून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

हस्तिनापूरमधील कृष्णा किड्स प्ले स्कूलचे संचालक अतुल कुमार (वय ३२) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी दामिनी आणि तिचा प्रियकर तुषार या दोघांना अटक केली आहे. या हत्येला नैसर्गिक अपघाताचे रूप देण्याचा दामिनीचा प्रयत्न होता, मात्र कुटुंबाच्या संशयावरून पोलिसांनी तपास चक्र फिरवली असता, दामिनीचे स्कूल बस ड्रायव्हर तुषारसोबत असलेले प्रेमसंबंध आणि सापाने घडवून आणलेला हा कट उघडकीस आला. सापाचा डंख मारून पतीचा काटा काढणाऱ्या या 'दामिनी'च्या क्रूरतेची आता उत्तर प्रदेशात जोरदार चर्चा रंगली आहे.

Meerut wife kills husband with venomous snake
Abhijit Dipke : जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंना पोलिसांची मारहाण, आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न, खळबळजनक आरोप

अतुल कुमार हे पत्नी दामिनी आणि दोन मुलांसह हस्तिनापूरच्या शंकुतला कॉलनीत भाड्याच्या घरात राहत असे. अतुलचा मोठा भाऊ कुलदीप नोएडामध्ये पोलीस अधिकारी आहे. अतुल कुमार हस्तिनापूरमध्ये 'कृष्णा किड्स प्ले स्कूल' चालवत असे. त्याची पत्नी दामिनीसुद्धा त्याच शाळेत शिकवत असे. अतुल आणि दामिनी यांचे सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. गुरुवारी रात्री ते जोडपे एकाच खोलीत झोपले होते.

Meerut wife kills husband with venomous snake
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना पोलिसांनी नेले रुग्णालयात; जंतरमंतरवरून आंदोलकांनाही हटवले, दिल्लीत हालचालींना वेग

दामिनीने सांगितले की, ती पहाटे दोन वाजता मुलांसोबत दुसऱ्या खोलीत गेली होती. ती सकाळी सहा वाजता उठली आणि चहा घेऊन खोलीत परत आली. अतुल कुमार पलंगावर चादर पांघरून झोपला होता. हाक मारूनही अतुल कुमार जागा झाला नाही. मग दामिनीने पांघरूण बाजूला केले. अतुलच्या शेजारी पलंगावर एक साप पडलेला होता. ती ओरडली आणि जवळच्या लोकांना बोलावले. त्यांनी सापाला मारून एका पेटीत बंद केले. लगेचच त्यांनी अतुलला हस्तिनापूरमधील डॉक्टरकडे नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Meerut wife kills husband with venomous snake
सांगलीत राजकीय भूकंप! जयंत पाटलांनंतर खासदार विशाल पाटलांना मोठा धक्का; 'या' पंचायत समितीचे सभापती पद रद्द

दामिनीने भंडौरा येथील कुटुंबीयांना अतुलच्या मृत्यूची माहिती दिली. ही घटना अपघाती सर्पदंश असल्याचे कुटुंबीयांनी नाकारले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिजीत कुमार यांनी सांगितले की, दामिनीचे स्कूल व्हॅन चालक तुषार पायलासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तुषार पायलाने साप विकत घेऊन अतुल झोपल्यानंतर त्याच्या पलंगावर ठेवल्याची कबुली दिली.

Meerut wife kills husband with venomous snake
Mumbai–Pune : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका! ८ दिवस लोकलसह 'या' एक्सप्रेस गाड्या रद्द, काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com