सांगलीत राजकीय भूकंप! जयंत पाटलांनंतर खासदार विशाल पाटलांना मोठा धक्का; 'या' पंचायत समितीचे सभापती पद रद्द

Sangli political latest news : सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे पद अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी रद्द केले आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटी आणि सदस्याच्या अपहरण प्रकरणाची दखल घेत हा निर्णय देण्यात आला.
Vishal Patil, Jayant Patil
Vishal Patil, Jayant PatilSaam
Published On

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Miraj Panchayat Samiti chairperson election cancelled : सांगली जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. इस्लामपूर (ईश्वरपूर) नगराध्यक्ष पदाच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मिरज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापती पद अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी रद्द केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय दणका मानला जात आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तन्वी कमलेकर अवघ्या एका मताने विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत स्पष्ट बहुमत असूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या निवडणुकी दरम्यान शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या एका सदस्याचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.

या संपूर्ण प्रक्रियेत अपारदर्शकता आणि नियमबाह्य गोष्टी झाल्याचा आरोप करत भाजपच्या कवलापूर येथील पंचायत समिती सदस्या राणी भोरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Vishal Patil, Jayant Patil
Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

अतिरिक्त विभागीय आयुक्तांची कारवाई

या याचिकेवर सुनावणी करताना अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि सदस्याच्या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अखेर त्यांनी मिरज पंचायत समितीचे सभापती पद रद्द (अपात्र) करण्याचा मोठा निर्णय दिला. तसेच, मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक पुन्हा नव्याने घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या कारवाईमुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात होणाऱ्या फेरनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vishal Patil, Jayant Patil
Pune Fire: पुण्यात मध्यरात्री भीषण आग! पेंटिंग गोडाऊन जळून खाक, एका कामगाराचा मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवडणुकीचे आदेश

अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या या दणक्यामुळे मिरज पंचायत समितीचे सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. आता या रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापती पदासाठी पुन्हा एकदा नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ईश्वरपूर पाठोपाठ आता मिरजेतही सत्ताधारी गटाला मोठा कायदेशीर फटका बसल्याने सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी फेरनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vishal Patil, Jayant Patil
Mumbai : लाईफलाईन बनतेय क्राईमलाईन, कल्याणच्या आणि डोंबिवलीच्या महिलांमध्ये सीटवरून भांडण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com