Sonam Wangchuk taken to hospital by police : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागील २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि समाजसेवक सोनम वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. (sonam wangchuk hunger strike)
सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या इतर आंदोलकांना आणि समर्थकांनाही पोलिसांनी तिथून हटवण्यास सुरुवात केली आहे. लदाखला विशेष राज्याचा दर्जा (६ वी अनुसूची) मिळावा आणि पर्यावरण रक्षणासाठी वांगचूक हे दिल्लीत मोठे आंदोलन करत आहेत. वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यामुळे आता या आंदोलनाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sonam Wangchuk यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न?
नवी दिल्लीतील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात येतोय... कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हा गंभीर आरोप केलाय... शांततापूर्ण आंदोलन मोडून काढण्यासाठी गुंडांनी वांगचुक यांच्यावर वस्तू फेकल्याचं त्यांनी सांगितलं... सुदैवानं वांगचुक यांना दुखापत झाली नसून, त्यांना काही झाल्यास सरकारच जबाबदार असेल, असा इशारा दिपके यांनी दिलाय...
जंतर-मंतरवरील उपोषण दिल्ली पोलिसांनी रोखले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. आज त्यांच्या उपोषणाचा २१ वा दिवस होता. दीर्घकाळ चाललेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती, ज्यामुळे त्यांना जंतर-मंतरवरून हलवून तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. लडाखच्या स्थानिक संस्कृतीचे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि तेथील नागरिकांना लोकशाही हक्क मिळावेत यासाठी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाख ते दिल्ली असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या उपोषणाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता.
आंदोलकांमध्ये नाराजी
वांगचुक यांना पोलिसांनी अशा प्रकारे आंदोलनस्थळावरून हटवल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि लडाखमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने मात्र हा निर्णय केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षेच्या कारणास्तव घेतला असल्याचे म्हटले आहे. सध्यातरी रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.