Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये तरुणाने बलात्कार करून गर्लफ्रेंडची हत्या केली. हत्येनंतर तो पनवेल येथे पळून आला. याठिकाणी त्याने गर्लफ्रेंडच्या आत्म्याला बोलावून सॉरी बोलण्याचा प्रयत्न केला. या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले.
Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...
Indoor Crime Saam Tv
Published On

Summary -

  • इंदूरमध्ये एमबीबीएस विद्यार्थिनीची हत्या

  • बॉयफ्रेंडने बलात्कार करून तिची हत्या केली

  • आरोपी बॉयफ्रेंडला पनवेलमधून अटक

  • आरोपीने पनवेलच्या जंगलात बसून गर्लफ्रेंडची आत्मा बोलावण्याचा प्रयत्न केला

मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये भयंकर हत्याकांडाची घटना घडली होती. एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची बलात्कार करून तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केली होती. इंदुरच्या द्वारकापुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंकल गलीमध्ये एका फ्लॅटमध्ये या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. गर्लफ्रेंडची हत्या करून आरोपी मुंबईत पळून आला होता. घटनेच्या चार दिवसांनंतर त्याला नवी मुंबईतल्या पनवेल येथून अटक करण्यात आली. पीयूष धामनोतिया असे आरोपीचे नाव असून चारित्र्याचा संशय आणि लग्नावरून झालेल्या वादानंतर त्याने हे भयंकर कृत्य केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली तरुणी आणि पियूष हे कॉलेजपासून एकमेकांना ओळख होते. त्यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पीयूषने द्वारकापुरीमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता. घटनेच्या दिवशी दोघेही फ्लॅटवर गेले. सुरूवातीला दोघांनी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीयूष आणि तरुणी यांच्यामध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाले.

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...
Shocking: निवृत्त जवानानं बायको अन् मुलाला गोळ्या झाडून संपवलं, नंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

पीयूषला संशय होता की त्याची गर्लफ्रेंड इतर तरुणांशी बोलते. वाद इतका वाढला की पीयूषने तिची हत्या केली. त्याने गर्लफ्रेंडच्या तोंडात कापड कोंबले आणि तिच्या अंगावर बसून तिचा गळा आवळला. त्यानंतर पीयूषने तिच्यावर चाकूने वार केले. हे वार इतके भयंकर होते की त्यामध्ये चाकू देखील तुटला. बराच वेळ गर्लफ्रेंडच्या मृतदेहाजवळ तो बसून राहिला आणि दारू प्यायला. त्यानंतर फ्लॅटला कुलूप लावून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...
Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून आई-वडिलांची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

पीयूष इंदूरवरून महाराष्ट्रातील पनवेल येथे पळून आला. त्याने याठिकाणी एका हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. पनवेलजवळील जंगलात जाऊन त्याने मोबाइलवर युट्यूब ओपन करून त्यावर मृतदेहाशी संवाद कसा साधायचा? हे सर्च केले. त्याने अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ पाहिले. याठिकाणी त्याने धूप जाळून आणि तांत्रिक विधी करत गर्लफ्रेंडचा आत्मा बोलावण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'तो मला माफ कर' असं बोलत होता. त्यानंतर त्याने रात्रभर मुंबईत लोकलने प्रवास केला. पुराने नष्ट करण्यासाठी त्याने गर्लफ्रेंडचा मोबाइल देखील नष्ट केला. अखेर चौथ्या दिवशी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...
Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com