Crime News : कुजलेला चेहरा अन् अर्धवट पुरलेला मृतदेह, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, नेमकं झालं काय?

Gadchiroli Crime News : गडचिरोलीत गावतलावाजवळ पुरलेला तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी ७२ तासांत प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येचा छडा लावत पाच आरोपींना अटक केली.
Crime News : कुजलेला चेहरा अन् अर्धवट पुरलेला मृतदेह, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, नेमकं झालं काय?
Gadchiroli Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • कोरची तालुक्यात युवकाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला

  • मृतदेह अंशतः उघडा पडल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली

  • प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

  • ७२ तासांत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली

गडचिरोली मधील कोरची तालुक्यातील कोटरा ते बोगाटोला रस्त्यालगतच्या गावतलावाजवळ एका २५ ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तब्बल ७२ तासांनंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज असून ५ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी कोटरा ते बोगाटोला रस्त्यालगतच्या गावतलावाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळला. सदर मृतदेह पूर्णपणे जमिनीखाली नसल्याने मृतदेहावरील माती बाजुला होऊन तो थोडा उघडा पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तब्बल ७२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांच्या शोध मोहिमेला यश मिळाले.

Crime News : कुजलेला चेहरा अन् अर्धवट पुरलेला मृतदेह, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, नेमकं झालं काय?
Accident News : समृद्धीवर भयंकर अपघात, ठाण्याहून नागपूरला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा जागीच मृत्यू

मृत देहाचा चेहरा कुजलेला असल्याने चेहरा ओळखु येत नव्हता. त्यामुळे गुन्हयाचा छडा लावणे हे आव्हानात्मक होते. पोलिसांना घटनास्थळावर काही संशयास्पद वस्तु आढळल्या. त्यात एक प्लास्टीकची पोतळी आणि पुरण्यासाठी म्हणुन काहीतरी टीकावुसारखे हत्यार वापरले असावे असा घटनास्थळावरील निशानीचा आधार घेत तपास सुरू करण्यात आला

Crime News : कुजलेला चेहरा अन् अर्धवट पुरलेला मृतदेह, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, नेमकं झालं काय?
Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?

कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील ४ इसम हे सदर परीसरात, एका घरातून टिकावु घेवुन गेले असल्याची माहिती मिळाली. या आधारावर चौकशी केली असता प्रेमसंबंध प्रकरणावरून प्रेयसीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्यासोबत मिळून हत्या केली असल्याचं उघड झालं. दरम्यान पोलिसांनी पाचही आरोपींना अवघ्या ७२ तासांत अटक केली. मात्र हत्येमागील कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com