Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून आई-वडिलांची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Bengaluru Crime Saam Tv

Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून आई-वडिलांची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

Bengaluru Crime: बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने चाकूने सपासप वार करत आई-वडिलांची हत्या केली. या तरुणाचे वडील रिटायर्ड नेव्ही अधिकारी आणि आई डॉक्टर होती. हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही.
Published on

Summary -

  • बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या

  • चाकूने सपासप वार करत दोघांनाही जागीच संपवलं

  • तरुणाचे वडील निवृत्त नेव्ही कॅप्टन आणि आई डॉक्टर होती

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने आपल्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे. या तरुणाने आई आणि वडिलांची चाकूने वार करत हत्या केली. या तरुणाचे वडील रिटायर्ड नेव्ही कॅप्टन आणि त्याची आई डॉक्टर होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विज्ञाननगर येथील आदर्श विस्टा अपार्टमेंटमध्ये घडली. बुधवारी सकाळी सडेसात वाजताच्या सुमारास या तरुणाने आई-वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या आई आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला. नवीन चंद्र भट (६० वर्षे) आणि डॉ. श्यामला भट (५५ वर्षे) अशी हत्या झालेल्या नवरा-बायकोची नावं होती.

Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून आई-वडिलांची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

तरुणाने आई-वडिलांवर चाकूने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. कौटुंबीक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आरोपी रोहन चंद्र भट हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तो स्वत:चा व्यवसाय देखील करायचा. या तरुणाने आई-वडिलांची हत्या का केली यामागचे कारण शोधले जात आहे. या तरुणाची बहीण अमेरिकेत राहते. तिला घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून आई-वडिलांची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Crime News : धक्कादायक! वर्ग शिक्षकाची विद्यार्थिनींवर वाईट नजर, ४ अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com