Pune crime: कोयता घेऊन दहशत माजवली, गाड्या फोडल्या पोरांनी, गुन्हा मात्र आई- वडिलांवर; पुण्यात खळबळ

Pune Police: पुण्यात सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवणे आणि वाहनांची तोडफोड करणे या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.
Pune Crime
Pune CrimeSaam
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवणे आणि वाहनांची तोडफोड करणे या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशातच सिंहगड रोड परिसरातील हिंगणे भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. काही तरूणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. तसेच १५-२० वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर थेट कारवाई न करता त्यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या हिंगणे भागात काही १५-२० तरूणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीमध्ये दुचाकी तसेच चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटने संदर्भात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात काही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune Crime
Pune BJP: भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांना शिवीगाळ अन् मारण्याची धमकी; पुण्यात खळबळ

पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास करायला सुरुवात केली असता वाहनांची तोडफोड करणारे सर्वजण अल्पवयीन असल्याचं लक्षात आलं. इतकंच काय तरी सर्वजण दारूच्या नशेत असल्याचा देखील तपासातून समोर आलं आहे.

अल्पवयीन असल्यामुळे आरोपींना अटक करता येत नसली, तरी पोलिसांनी थेट त्यांच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी ज्या बारमधून या अल्पवयीन तरुणांनी दारूची खरेदी केली होती तो बार सील केला आहे. बार मालकावर अल्पवयीनांना मद्यपुरवठा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Crime News: बायको अन् बॉयफ्रेंडचा बेडवर रोमान्स, नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं; संतापून पत्नीनं तलवारीनं पतीला संपवलं

पोलिस उपआयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेला पुण्यातील हिंगणे भागात येथे काही तरुणांनी वाहनं तोडफोड केली आहेत अशी माहिती मिळाली होती. २० वाहनांचे मोठे नुकसान या घटनेत झाले होते. या गुन्ह्यात काही अल्पवयीन तरुणांचा समावेश होता. अल्पवयीन तरुणांना अटक करता येत नसल्याने याप्रकरणात त्या तरुणांच्या आई वडिलांना आरोपी करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com