युद्ध पुन्हा धुमसलं; इस्त्रायलच्या भीषण हल्ल्यात २५४ जणांचा मृत्यू,भारताचंही टेन्शन वाढलं

israel attack lebanon : इस्त्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्यात एकूण २५४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
israel attack
israel attack lebanon Saam tv
Published On
Summary

इस्त्रायलकडून लेबनॉनवर भीषण हल्ला

भीषण हल्ल्यात लेबनॉनमधील २५४ जणांचा मृत्यू

इराणकडून हॉर्मूझची सामुद्रधुनी देखील बंद

अमेरिका आणि इराणने संगनमताने दोन आठवड्यांची शस्त्रसंधीची घोषणा केली. युद्धविराम जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच इस्त्रायलकडून लेबनॉनवर भीषण हल्ला केला. या भीषण हल्ल्यात २५४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर ११६५ हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात लेबनॉनच्या इमामचाही मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी देखील बंद केल्याने भारताचंही टेन्शन वाढलं आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी लेबनॉनवर हल्ला न करण्याचा इशारा दिला होता. इराणने इस्त्रायलकडून हल्ले थांबवले नाही, तर शस्त्रसंधीचा करार रद्द करू, असे जाहीर केले होते. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, इराण-अमेरिकेमधील शस्त्रसंधीच्या अटी स्पष्ट आहेत. अमेरिकेला शस्त्रसंधी निवडावी लागेल किंवा इस्त्रायलच्या माध्यमातून युद्ध कायम ठेवावे लागेल. त्यांना दोन्हीपैकी एकच निवडावे लागेल'.

israel attack
इराणचा इस्त्रायलवर भीषण हल्ला, इस्त्रायलवर तासाला 10 क्षेपणास्त्रांचा मारा

लेबनॉनवर इस्त्रायलने हल्ला केल्यानंतर इराणने होर्मूझची सामुध्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरच्या दळणवळणास बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे हिज्बुल्लाह संघटनेने इशारा दिला आहे की, शस्त्रसंधीत लेबनॉनचा समावेश केला नाही, तर करार रद्द होऊ शकतो. या संघटनेने इस्त्रायलने हल्ले सुरूच ठेवले, तर प्रत्युत्तर दिलं जाईल'.

ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या माहितीनुसार, इराणच्या नौदलाने तेहरानच्या परवानगीशिवाय होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. या मार्गात परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्या जहाजावर भीषण हल्ले करून उद्ध्वस्त केले जाईल'.

israel attack
इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू काय म्हणाले?

अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली. परंतु इस्त्रायलने लेबनॉनमधील लष्करी मोहीम थांबवण्यात स्पष्ट नकार दिलाय. पंतप्रधान नेत्यानाहू यांनी स्पष्ट केलं आहे की, 'लेबनॉन हा शस्त्रसंधीचा भाग नाही. त्यामुळे लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच राहतील'. या निर्णयाने आखाती देशात तणाव आणखी वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com