इराणचा इस्त्रायलवर भीषण हल्ला, इस्त्रायलवर तासाला 10 क्षेपणास्त्रांचा मारा

Iran Israel Conflict: इराण- इस्रायल संघर्ष आता पुन्हा एकदा पेटलाय... इराणनं इस्रायलवर 10 घातक हल्ले केलेत... इराणनं जगाला धडकी भरवणारा कोणता इशारा दिलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Iran launches a massive missile barrage on Israel, intensifying the ongoing Middle East conflict.
Iran launches a massive missile barrage on Israel, intensifying the ongoing Middle East conflict.Saam tv
Published On

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी युद्धविरामाची घोषणा केली असली तरी . इराणनं पुन्हा एकदा इस्त्रायलला लक्ष्य करत आपले मनसुबे स्पष्ट केलेत. इराणनं इस्त्रायलवर तब्बल 220 क्षेपणास्त्रे एकाच वेळी डागली आहेत. म्हणजेच, दर तासाला सरासरी 10 क्षेपणास्रांचा मारा करण्यात आलाय. या हल्ल्यांनंतर इराणकडून करण्यात आलेले दावे जगाला धडकी भरवणारे आहेत.

इराणच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात फताह-२, सेज्जिल, इमाद आणि खोर्रमशहर-४ यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आलाय. ही नवीन क्षेपणास्त्र अधिक धोकादायक असल्याचा दावा इराणनं केलाय. ही क्षेपणास्त्र त उच्च गतीमुळे आणि दिशा बदलण्याच्या क्षमतेमुळे हवाई संरक्षण यंत्रणांना चकवा देऊ शकतात. तसेच, अनेक क्षेपणास्त्रांमध्ये क्लस्टर वॉरहेड्स बसवण्यात आल्यानं त्यामुळे होणारा विध्वंसही तेवढाच विनाशकारी आहे.

खरंतर, इराणकडून इस्रायलविरोधात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले होतायत. तसंच, इस्त्रायलनंही प्रतिह्ल्ला करत इराण- रशियासोबत व्यापार करत असलेल्या मार्गात व्यत्यय आणलाय. त्यामुळे एकीकडे अमेरिका युद्धविरामाची चर्चा करत असली तरी दुसरीकडे इराणच्या दाव्यामुळे मध्य-पूर्वेतील युद्ध लवकर थांबेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com