

तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग
भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू
जखमींना तातडीने केलं रुग्णालयत दाखल
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कट्टरनारपट्टी भागात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटाची घटना घडली आहे. स्फोटानंतर ४ युनिट्स जळून खाक झाले. आग लागल्यानंतर सर्वांची एकच धावाधाव झाली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिकांनी तातडीने मदतीला धावले. कारखान्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झालं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग लागल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कारखान्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. कारखान्यात कशामुळे स्फोट झाला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. फटाक्यांच्या कारखान्यात निष्काळजीपणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर स्थानिक प्रशासनाने जलद गतीने मदतीचे कार्य सुरू केलं आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कारखान्यात आग लागल्यानंतर बचाव कार्य करण्याला प्राधान्य देत आहोत. जखमींना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी प्राधान्य दिले जात आहेत. या आगीच्या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १३ जणांचा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने कट्टरनारपट्टी भागात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.