Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू; स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला

Madhya Pradesh Factory Blast: मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटामध्ये ४ जणांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू; स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला
Madhya Pradesh Factory BlastSaam Tv
Published On
  • मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

  • देवास येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात ४ जणांचा मृत्यू

  • स्फोटामुळे परिसर हादरला

  • स्फोटामध्ये ११ जण गंभीर जखमी झालेत

मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशातील देवास येथील टोंक कलान भागामध्ये ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कारखान्यात कामगार काम करत असताना हा स्फोट झाला. मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, टोंक कलान भागामध्ये फटाक्यांचा मोठा कारखाना आहे. या कारखान्यात अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की कंपनीच्या आवारात काम करणारे कर्मचारी घाबरून बाहेर पळाले. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. काही क्षणांतच घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू; स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला
IED Blast: शक्तिशाली स्फोटात डीआरजीचे ३ जवान शहीद; नक्षलवाद्यांनी घडवून आणला हल्ला

या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या स्फोटामध्ये १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ११ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी इंदूरला हलवण्यात आले आहे.

Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू; स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला
Breaking News : भरबाजारात शक्तिशाली स्फोट, २ ट्रॅफिक पोलिसांसह ८ जणांचा मृत्यू; ३५ हून अधिक जखमी, पाकिस्तान हादरलं

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर कंपनीच्या आवारात आगीचे लोळ आणि धुरांचे लोट पसरले होते. या स्फोटामुळे आसपासची घरं हादरली. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने अद्याप कंपनीचे नाव आणि स्फोटामागचे नेमके कारण सांगितले नाही. हा स्फोट अपघातामुळे की स्फोटक पदार्थांमुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सध्या याचा तपास केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू; स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला
Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com