

छत्तीसगडच्या बस्तरमध्ये आयईडी स्फोटात ३ जवान शहीद
नक्षलवाद्यांनी पेरलेले आयईडी निकामी करताना स्फोट झाला
शक्तीशाली स्फोटामध्ये ३ जनानांचा मृत्यू झाला.
एक जवान गंभीर जखमी झाला असून उपचार सुरू आहेत.
छत्तीसगडच्या बस्तर विभागातील नक्षलग्रस्त भागातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर शनिवारी नक्षलवाद्यांकडून आयईडीचा स्फोट करण्यात आला. या स्फोटामध्ये ३ जवान शहीद झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा राखीव दलाचे एक पथक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर शोध आणि सुरुंग निर्मूलन मोहीम राबवत होते. नक्षलवाद्यांनी पेरलेला एक आयईडी निकामी करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की यामध्ये तीन जवान जागीच शहीद झाले. एक जवान जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
शहीद झालेल्या जवानांमध्ये डीआरजी इन्स्पेक्टर सुखराम वट्टी, कॉन्स्टेबल कृष्णा कोमरा आणि कॉन्स्टेबल संजय गडपाले यांचा समावेश आहे. कॉन्स्टेबल परमानंद कोमरा हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आणि इतर गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बस्तर परिक्षेत्रात मोठ्या संख्येने लपवलेले आयईडी जप्त करून ते निकामी केले आहेत.
बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज पिट्टिलिंगम यांनी सांगितले की, 'आजची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कांकेर जिल्हा पोलिसांचे पथक आयईडी निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला. या घटनेत ३ जवान शहीद झाले असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे जेणेकरून इतर कोणतीही लपवलेली स्फोटके वेळेत निकामी करता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.