राष्ट्रध्वज फडकवल्यानं तरूणाला संपवलं, नक्षलवाद्यांनी अख्ख्या गावासमोरच शिक्षा सुनावली, नंतर फरफटत नेत..

Independence Day Tragedy: छत्तीसगडच्या बिनागुंडा गावात १२वी उत्तीर्ण मुनेश नूरूटीची नक्षलवाद्यांनी हत्या केली. स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे त्याच्यावर नक्षलवाद्यांनी कारवाई केली.
Chhattisgarh Shocker
Chhattisgarh ShockerSaam TV News
Published On
Summary
  • छत्तीसगडच्या बिनागुंडा गावात १२वी उत्तीर्ण मुनेश नूरूटीची नक्षलवाद्यांनी हत्या केली.

  • स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे त्याच्यावर नक्षलवाद्यांनी कारवाई केली.

  • जन अदालत भरवून गावकऱ्यांसमोरच त्याला मृत्यूदंड देण्यात आला.

  • या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी तरूणाची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात घडली आहे. १५ ऑगस्ट रोजी सर्वांनी स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा केला. बिनागुंडी गावातही उत्साहाने एका तरूणानं तिरंगा फडकावला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी नक्षलवाद्यांनी तिरंगा फडकवणाऱ्या तरूणाची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मुनेश नूरूटी असे बारावी उत्तीर्ण मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना माड परिसरातील बिनागुंडा गावातील आहे. मुनेश गावातील मोजक्या शिक्षित तरूणांपैकी एक होता. त्यानं स्वातंत्र्य दिनानिमित्त गावात झेंडावंदन करण्याचा निर्णय घेतला. १५ ऑगस्ट रोजी मुनेशनं गावातील शाळेत नक्षल स्मारकावरच राष्ट्रीय ध्वज फडकवला.

ध्वज फडकवण्याचं धाडस केल्यानंतर अनेकांनी कॅमेऱ्यात हा क्षण कैद केला. काही क्षणात याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला. मुनेशचा ध्वज फडकवत असतानाचा व्हिडिओ थेट नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचला. यानंतर नक्षलवाद्यांची एक तुकडी बिनागुंडी गावात दाखल झाली. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांसमोरच जन अदालत भरवली.

Chhattisgarh Shocker
अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

नक्षलवाद्यांनी राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतलं. तसेच त्याला दोषी ठरवत मृत्यूदंड ठोठावलं. नक्षलवाद्यांनी त्याच दिवशी मुनेशला ठार मारलं. गळा आवळून मुनेशची हत्या केली. यानंतर मुनेशच्या कुटुंबियांनी भीतीपोटी या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली नव्हती.

Chhattisgarh Shocker
मुंबई - कोल्हापूर, कोल्हापूर- तिरूपती प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; रेल्वेत मोठे बदल

मुनेशच्या कुटुंबियांनी त्याचे अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर १७ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी गावात एक पोस्टर लावलं. या पोस्टरमधून त्यांनी मुनेशच्या हत्येची जबाबदारी घेतली. तसेच त्याला पोलिसांचा मुखभिर असल्याचं सांगितलं. यासह गद्दार असं म्हटलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनेची नोंद घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

सध्या पोलिसांकडून राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे मुनेशची हत्या करण्यात आली आहे का? या दृष्टीनेही तपास सुरू आहे, अशी माहिती कांकेरचे पोलीस अधिक्ष कल्याण एलीसेला यांनी दिली आहे. स्वांतत्र्य दिनी प्रत्येक नागरिकानं अभिमानाने राष्ट्रीय ध्वज फडकवला. पण नक्षलवादी भागात तरूणाची राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे हत्या करण्यात आल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Chhattisgarh Shocker
पुणेकरांचा काही नेम नाही, दौंडच्या पठ्ठ्यानं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com