मुंबई - कोल्हापूर, कोल्हापूर- तिरूपती प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; रेल्वेत मोठे बदल

Express News: मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस आता सुधारित संरचनेसह धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Kolhapur Express
Kolhapur ExpressSaam tv
Published On
Summary
  • मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस व कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस सुधारित संरचनेसह धावणार.

  • एसी डबे, शयनयान व सामान्य डब्यांचा समावेश असलेली नवी रचना लागू.

  • १८ ते २१ ऑक्टोबर २०२५ पासून या गाड्यांना सुधारित संरचना मिळणार.

  • अधिक माहिती भारतीय रेल्वे संकेतस्थळावर व NTES अॅपवर उपलब्ध.

मुंबई कोल्हापूर किंवा कोल्हापूरहून तिरूपतीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस आता सुधारित संरचनेसह धावणार आहे. मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार,  मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस या गाड्या नव्या सुधारित संरचनेसह चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

सुधारित संरचना

१ वातानुकूलित प्रथम वर्ग

२ वातानुकूलित द्वितीय वर्ग

१ वातानुकूलित तृतिय वर्ग

तीन वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी

८ शयनयान

चार सामान्य द्वितीय वर्ग

१ जनरेटर

१ दुसरी सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

Kolhapur Express
अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

खालील गाड्या सुधारित संरचनेसह धावतील

ट्रेन क्रमांत १७४११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस

सुधारित श्रेणींच्या संरचनेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २० ऑक्टोबर २०२५ पासून चालवण्यात येईल.

ट्रेन क्रमांक १७४१२ कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्स्प्रेस

सुधारित श्रेणींच्या संरचनेसह कोल्हापूर येथून १९ ऑक्टोबर २०२५ पासून चालवण्यात येणार आहे.

Kolhapur Express
राज्यात आणखी एक घराणं फुटलं; काँग्रेस खासदाराच्या दिराचा भाजपमध्ये प्रवेश, १० माजी नगरसेवकांनीही कमळ हाती घेतलं

ट्रेन क्रमांक १७४६ कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस

सुधारित श्रेणींच्या संरचनेसह कोल्हापूर येथून २१ ऑक्टोबर २०२५ पासून चालवण्यात येईल.

ट्रेन क्रमांक १७४५ तिरुपती - कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस

सुधारित श्रेणींच्या संरचनेसह तिरुपती येथून दि. १८ ऑक्टोबर २०२५ पासून चालवण्यात येईल.

Kolhapur Express
बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतात शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं; किटकनाशक पिऊन मृत्यूला कवटाळलं

या गाड्यांबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळेल. किंवा एनटीएस अॅपवर डाऊनलोड करता येईल. प्रवाशांनी कृपया बदल लक्षात घ्यावे असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com