पुणेकरांचा काही नेम नाही, दौंडच्या पठ्ठ्यानं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज

Pune Daund: दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने थेट उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या त्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे.
Pune Daund News
Pune Daund NewsSaam TV News
Published On
Summary
  • भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.

  • एनडीए कडून सी.पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांची नावे समोर आली आहेत.

  • दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे यांनीही उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • उमेश म्हेत्रे यांनी अर्जासोबत १५ हजार रुपयांचे डिपॉझिट भरले असून त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.

भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांची नावे पुढे येत आहेत. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील. तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील एका तरूणानंही उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरूण उमेश म्हेत्रेनं थेट भारताच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना त्यांनी नवी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे अर्ज दाखल केला.

Pune Daund News
अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

यावेळी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १५ हजार रूपयांचे रूपयांचे डिपॉझिट जमा केले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गावातील एका साध्या तरूणानं थेट देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Pune Daund News
'तुला भुतानं झपाटलंय' तांत्रिक बाबानं बोलावलं, विधीच्या नावाखाली बलात्कार, मुंबई हादरली

उमेश म्हेत्रेनं याआधी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केला होता. विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरताना १० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अनिवार्य असतं. अशा स्थितीत आमदाराच्या पाठिंब्याचं पत्र नसेल तर, हा अर्ज बाद केला जातो. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता.

Pune Daund News
पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com