Mumbai Shocking Crime News
Mumbai Shocking Crime NewsSaam Tv News

'तुला भुतानं झपाटलंय' तांत्रिक बाबानं बोलावलं, विधीच्या नावाखाली बलात्कार, मुंबई हादरली

Mumbai Shocking Crime: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४५ वर्षीय तांत्रिक अब्दुल रशीद याच्यावर ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.
Published on
Summary
  • मुंबईत तांत्रिकाने विधीच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केला.

  • ३२ वर्षीय महिला कुटुंबीय समस्येमुळे तांत्रिकाकडे गेली होती.

  • आरोपी अब्दुल रशीदविरुद्ध सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • आरोपी फरार असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुंबईयेथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३२ वर्षीय महिलेनं एका तांत्रिकावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपीनं भुतबाधेपासून मुक्त करण्यासाठी विधी करण्यास सांगितले. महिलेला बोलावून घेतलं. नंतर जबरदस्ती करत महिलेचे अब्रुचे लचके तोडले, अशी माहिती पीडितेनं दिली. यानंतर महिलेनं थेट सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

अब्दुल रशिद (वय वर्ष ४५) असे आरोपी तांत्रिकाचे नाव आहे. त्यानं ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील समस्या आणि आरोग्याच्या समस्यांमुळे पीडित मुलगी त्रस्त होती. मदतीसाठी तिनं तांत्रिक बाबाकडे धाव घेतली. आरोपीनं पीडितेला भुतबाधा झाले असल्याचं सांगितलं.

Mumbai Shocking Crime News
मोनो रेलमध्ये २०० प्रवासी अडकले; प्रवाशांचा श्वास गुदमरला, भरपावसात रेस्क्यू ऑपरेशन, व्हिडिओ व्हायरल

अंगातील भुत उतरवण्यासाठी तांत्रिकाने पीडितेला विधी करण्याचा सल्ला दिला. ऑगस्टच्या सुरूवातीला, आरोपी रशीदनं पीडित महिलेला भेटण्यासाठी बोलावून घेतलं. नंतर तिच्या जबरदस्ती करत बलात्कार केला. सुरूवातीला महिलेला वाटले की, हे कृत्य उपचारांचा एक भाग आहे. परंतु नंतर तिला समजले की तिची फसवणूक झाली आहे.

Mumbai Shocking Crime News
सांगली, सातारा, कोल्हापूर; काळेकुट्ट ढगांची वाटचाल पश्चिम महाराष्ट्राकडे, कुठे कशी परिस्थिती?

पीडित महिलेनं तत्काळ सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली. महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी रशीदविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Shocking Crime News
शरद पवार गटाला जोरदार धक्का; माजी आमदाराचा २,२७५ कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com