पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

Palghar Politics News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Palghar politics
Palghar politicsSaam Tv News
Published On
Summary
  • पालघरमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का.

  • माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम भाजपमध्ये दाखल.

  • युवा सेना जिल्हाप्रमुख रिकी रत्नाकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश.

  • रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश सोहळा.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजप पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे.

पालघरमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानसभेचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम आज भाजप पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. आज मोखाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपचं कमळ हाती घेणार आहेत.

Palghar politics
लेकीचा लग्नास नकार, वडिलांनी झोपेतच मुलीला संपवलं; नंतर स्वत: नस कापली; हिंगोलीत खळबळ

प्रकाश निकम यांच्यासोबत युवा सेना जिल्हाप्रमुख रिकी रत्नाकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तसेच जव्हार मोखाड्यातील बडे नेते जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य देखील पक्षप्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार आहे.

Palghar politics
एकीकडे राज ठाकरेंची भेट, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना फोन; खासदारांनी सगळंच सांगितलं

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी निकम आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा भाजप कार्यालयात पार पडणार आहे. बंडखोरी करताना पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने प्रकाश निकम नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Palghar politics
प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर - पुणे वंदे भारतबाबत रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com