Political Leader: 'मी तो नव्हेच' हायवेवर महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

Manohar Lal Dhakad: मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात नेते मनोहरलाल धाकड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
manohar lal dhakad got bail
manohar lal dhakad got bailx
Published On

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात राजकीय नेते मनोहरलाल धाकड यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, "या व्हिडिओत मी नाहीच," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

आज तकच्या वृत्तानुसार, जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या धाकड यांनी व्हायरल व्हिडिओसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. 'व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. माझा हा व्हिडिओ नाही. मी त्या व्हिडिओत नव्हतो. ती गाडीही माझी नव्हती. व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतर सत्य बाहेर येईल. मी न्यायालयात माझी बाजू मांडेन आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करेन',असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

manohar lal dhakad got bail
Crime News: बायको अन् बॉयफ्रेंडचा बेडवर रोमान्स, नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं; संतापून पत्नीनं तलवारीनं पतीला संपवलं

पोलिसांनी रविवारी मनोहरलाल धाकड यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी धाकडला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला तुरूंगात पाठवण्याचे आदेश दिले होते, मात्र काही तासांत त्यांना जामीन मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.

manohar lal dhakad got bail
Highway Video: हायवेवरच शरीरसंबंध ठेवणाऱ्या नेत्यासह त्या महिलेचे आणखी २ व्हिडिओ व्हायरल; रस्त्यावरच नग्नावस्थेत नाचत होते...

या प्रकरणात, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आपल्या तीन कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंगच्या आरोपांमुळे निलंबित केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे आणि ब्लॅकमेलिंगच्या पैलूची देखील चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com