ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल; पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Mamata Banerjee Fir Kolkata Hate Speech Case: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कोलकात्यात भडकाऊ भाषण प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे.
Mamata Banerjee faces legal trouble after FIR filed in Kolkata over alleged provocative speech.
Mamata Banerjee faces legal trouble after FIR filed in Kolkata over alleged provocative speech.saam tv
Published On

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यांच्या विरोधात राजधानी कोलकत्तामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप करण्यात आला असून एका व्यवसायिकाने त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. आता ह्याच तक्रारीचे रूपांतर एफआयआरमध्ये करण्यात आले.

नेमके प्रकरण काय?

कोलकतामध्ये 9 मार्च 2026 रोजी एका धार्मिक कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी भडकाऊ भाषण करत समाजात अशांतता पसरेल आणि धार्मिक भावना भडकेल अशी तक्रार तुषार कांतिदासने केली.

Mamata Banerjee faces legal trouble after FIR filed in Kolkata over alleged provocative speech.
Smriti Irani : मतदार यादीतून स्मृती इराणींचं नाव गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला?

पोलीस ठाणे: हरे स्ट्रीट, कोलकाता सेंट्रल डिव्हिजन

एफआयआर क्रमांक: ०१०६

एफआयआर नोंदणी क्रमांक: ३२७१२०१८२६०१०६

एफआयआर नोंदणीची तारीख आणि वेळ: ७ जून २०२६, दुपारी ३:४५

तक्रारीमध्ये असे नमूद केले आहे की, ममता बॅनर्जी यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केले. यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो आणि राज्यात कायद आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकप्रकारे त्यांनी धमकी दिली होती.

Mamata Banerjee faces legal trouble after FIR filed in Kolkata over alleged provocative speech.
Supreme Court : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना मिळणार ६३ लाख आणि ७.५ टक्के व्याजाने भरपाई; सुप्रीम कोर्टाचा आदेश

कोणत्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला?

एफआयआर कोणत्या कलमांखाली दाखल झाली?

ही एफआयआर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील तीन कलमांखाली दाखल करण्यात आली आहे.

कलम 196(1) - हे कलम धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर विविध गटांमध्ये द्वेष किंवा वैरभावना पसरवणाऱ्यांवर लागू होते.

कलम 351(2)- हे कलम गुन्हेगारी धमकीशी संबंधित आहे, म्हणजेच एखाद्याला घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी केलेले वक्तव्य.

कलम 352- हे कलम जाणूनबुजून एखाद्याला चिथावणी देणे किंवा त्रास देण्याशी संबंधित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com