मोठा दहशतवादी हल्ला; मालीत एकाच वेळी अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट, संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू

Mali Defense Minister Killed In Bomb Attack: मालीमध्ये भीषण दहशतवादी हल्ल्यांची मालिका; संरक्षण मंत्री सादियो कामारा आणि त्यांच्या कुटुंबाचा कार बॉम्बस्फोटात मृत्यू. अनेक शहरांमध्ये हिंसाचार वाढला असून सुरक्षा परिस्थिती गंभीर.
Security forces inspect the site after a deadly car bomb attack that killed Mali’s Defense Minister Sadio Camara and his family.
Security forces inspect the site after a deadly car bomb attack that killed Mali’s Defense Minister Sadio Camara and his family.saam tv
Published On

बामाको : मालीचे संरक्षण मंत्री सादियो कामारा यांच्या निवासस्थानी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते आणि त्यांचे कुटुंब ठार झाले आहे. या हल्ल्यात कामारा, त्यांची पत्नी आणि त्यांची दोन नातवंडे ठार झाली. राजधानी बामाकोच्या बाहेरील, लष्करी राजवटीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या किटा येथील कामारा यांच्या निवासस्थानी शनिवारी कार बॉम्बने हा हल्ला झाला. कामारा यांचे कुटुंब आणि एका अधिकाऱ्याने रविवारी या हल्ल्याची माहिती दिली.

Security forces inspect the site after a deadly car bomb attack that killed Mali’s Defense Minister Sadio Camara and his family.
Pakistan : पाकिस्तनाच्या निवृत्त लष्करप्रमुखांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आफ्रिका खंडातील पश्चिम भागात असलेल्या माली या देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावरील हा हल्ला अझावाद लिबरेशन फ्रंट (FLA) आघाडीचे तुआरेग बंडखोर आणि ग्रुप फॉर द सपोर्ट ऑफ इस्लाम अँड मुस्लिम्स" (JNIM) यांनी संयुक्तपणे केला होता. यामुळे मालीच्या अनेक भागांमध्ये या गटांमध्ये आणि सैन्यामध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. बामाकोजवळील किटा, किदाल, गाओ आणि सेवेरे येथे सर्वाधिक हिंसाचार दिसून येत आहे.

एका सुरक्षा सूत्राने माध्यमांना सांगितले की, हल्लेखोरांचा उद्देश लहान शहरांवर ताबा मिळवण्याचा नव्हता. त्यांचे लक्ष्य एका नियोजित मोहिमेद्वारे किमान किदाल शहर ताब्यात घेण्याचे होते. जे एक अत्यंत शक्तिशाली प्रतीक आहे. याच उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. माली देश एका दशकाहून अधिक काळापासून हिंसाचाराशी झुंज देत आहे. गेल्या दोन दिवसांत विशेषतः शनिवारी या हिंसाचारात मोठा हिंसाचार उफाळला. २०२० मध्ये देशात लष्कराने सत्ता काबीज केल्यापासूनचे शनिवारचे हल्ले हे सर्वात प्राणघातक मानले जात आहेत. अनेक गट लष्कराच्या विरोधात लढत आहेत.

Security forces inspect the site after a deadly car bomb attack that killed Mali’s Defense Minister Sadio Camara and his family.
इराणवर अणुहल्ला होणार का? ट्रम्प यांच्या धमकीनंतर मोठी अपडेट

माली आपल्या शेजारील देश नायजर आणि बुर्किना फासो यांच्यासह, अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित दहशतवादी संघटनांशी लढत आहे. गेल्या काही दिवसांत माली, नायजर आणि बुर्किना फासोमधील सुरक्षा बिघडली आहे. हल्ल्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून, लोकप्रतिनिधीसह सामान्य नागरिक लक्ष केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com