Pakistan : पाकिस्तनाच्या निवृत्त लष्करप्रमुखांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former Pakistan Army Chief Qamar Javed Bajwa Death News : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे.
Pakistan : पाकिस्तनाच्या निवृत्त लष्करप्रमुखांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Former Pakistan Army Chief Qamar Javed Bajwa Passes Away at 65Saam tv
Published On
Summary
  • जनरल कमर जावेद बाजवा यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन

  • डोक्याला दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू

  • २०१६ ते २०२२ दरम्यान लष्करप्रमुख पदावर कार्य

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे शनिवारी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी महिन्यात घरातील बाथरूममध्ये घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर पाकिस्तानी लष्करातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, जनरल बाजवा यांनी २०१६ ते २०२२ पर्यंत लष्कराचे नेतृत्व केलं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतचे त्यांचे तणावपूर्ण संबंध होते. २०२२ च्या सत्ता हस्तांतरणाच्या वेळी त्यांची भूमिका जागतिक चर्चेचा विषय बनली. इम्रान खान यांनी जाहीर सभांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप केले, ज्यात ते तटस्थ राहून विरोधी पक्षाला मदत करत असल्याचा आरोपही होता.

Pakistan : पाकिस्तनाच्या निवृत्त लष्करप्रमुखांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shocking : "मी तुझ्या लायकीचा नाही..." रेल्वेपुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

लष्कराने हा दावा फेटाळला. लष्करप्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळात संपत्तीत झालेली प्रचंड वाढही वादग्रस्त ठरली होती. तथापि, बाजवा यांच्या समर्थकांनी हे आरोप त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा कट असल्याचे सांगत फेटाळून लावले. त्यांच्या निधनाने पाकिस्तानच्या राजकारण आणि सुरक्षा यंत्रणेतील एका प्रभावशाली पर्वाचा अंत झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com