Bihar Shock: मुख्यमंत्र्यांना मोठा हादरा! निवडणुकीआधीच दोन दिग्गज नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली, बिहारच्या राजकारणात खळबळ

JDU leaders Dasai Choudhary and Bhuvan Patel quit Nitish Kumar : अनेक वर्षे आमदार, खासदार आणि मंत्री राहिलेले दसई चौधरी आणि संयुक्त जनता दलाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भुवन पटेल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची साथ सोडून प्रशांत किशोर यांच्या पक्षात प्रवेश केला.
मुख्यमंत्र्यांना झटका! बिहार निवडणुकीआधी दोन दिग्गज नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली
Nitish Kumar And Prashant kishorsaam tv
Published On

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांआधीच (Bihar Vidhan Sabha Elections) मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा हादरा बसला आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या दोन दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. अनेक टर्म आमदार, खासदार आणि मंत्रिपदी राहिलेल्या दसई चौधरी आणि पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य भुवन पटेल यांनी प्रशांत किशोर यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

जनसुराज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. पटनामध्ये झालेल्या कार्यक्रमात चौधरी आणि पटेल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे पत्र दिले. निवडणुकांआधीच झालेल्या या पक्षप्रवेशामुळं नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे.

पटनामधील पक्षाचे कार्यालय शेखपुरा हाऊसमध्ये उदय सिंह यांनी दसई चौधरी आणि भुवन पटेल यांचे जनसुराज पक्षात स्वागत केले. ही सर्व चांगली माणसे आहेत. त्यांनी बरीच वर्षे नितीश कुमार यांची साथ दिली आहे. यांच्यासारख्या अनेक चांगल्या लोकांना सोबत घेऊन नितीश कुमार यांनी चांगल्या पथावर मार्गक्रमण सुरू केलं होतं, असं उदय सिंह म्हणाले.

नितीश कुमार आता रस्ता चुकले आहेत. मी स्वतः त्यांचा खूप मोठा चाहता होतो. मात्र, आता बिहारला वेगाने सर्वनाशाकडं घेऊन जाणाऱ्यांच्या गराड्यात ते अडकले आहेत, अशी टीका उदय सिंह यांनी केली.

मी आमदार असताना नितीश कुमार काहीच नव्हते!

दसई चौधरी म्हणाले की, मी बरीच वर्षे संयुक्त जनता दलासोबत काम केलं आहे. मी जेव्हा आमदार होतो, त्यावेळी नितीश कुमार काहीच नव्हते. लालू प्रसाद यांच्या पक्षातून तीन वेळा आमदार झाल्यानंतर आम्ही त्यांच्याच विरोधात जाऊन नितीश कुमार यांची साथ दिली. मात्र, त्यानंतर नितीश कुमार यांनी आमच्याकडं दुर्लक्ष केलं. संघटना आणि सरकारमध्येही स्थान दिलं नाही.

आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे मागण्या केल्या. त्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, सकारात्मक असं काहीच घडलं नाही. अखेर प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आदर दिला. पक्षासोबत राहून काम करण्यास सांगितले, असे चौधरी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना झटका! बिहार निवडणुकीआधी दोन दिग्गज नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली
Bihar on High Alert : हायअलर्ट ! नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसले जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी, नावं आणि फोटोही केले शेअर

नितीश कुमार सर्वात जिनियस मुख्यमंत्री, पण...

जनसुराज पक्षात प्रवेश केल्यानंतर भुवन पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार हे सर्वात जिनियस मुख्यमंत्री आहेत. पण वयानुसार आता त्यांची क्षमता कमी होत चालली आहे. आता त्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक सरकार चालवत आहेत. संयुक्त जनता दलातून मोठ्या संख्येने लोक इतर पक्षांत प्रवेश करतील, असा दावा पटेल यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना झटका! बिहार निवडणुकीआधी दोन दिग्गज नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली
Maratha-OBC : राज्याचे मुख्यमंत्री चतुर आणि चाणक्य; काँग्रेस नेता असं का म्हणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com