Bihar on High Alert : हायअलर्ट ! नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसले जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी, नावं आणि फोटोही केले शेअर

3 Jaish-e-Mohammed terrorists enter in Bihar : बिहारमध्ये तीन दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. बहावलपूरचा मोहम्मद उस्मान, उमरकोटचा आदिल हुसैन आणि रावलपिंडीचा हसनैन अली अवान अशी या दहशतवाद्यांची नावं असून, त्यांचे फोटोही पोलिसांनी शेअर केले आहेत.
3 Jaish-e-Mohammed Terrorists Enter via Nepal
3 Jaish-e-Mohammed Terrorists Enter via Nepalsaam tv
Published On
Summary
  • बिहारमध्ये नेपाळमार्गे जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी घुसले

  • पोलिसांकडून नावं, फोटो आणि पासपोर्ट माहिती प्रसिद्ध केली

  • विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी

  • संशयित हालचालींबाबत माहिती देण्याचं नागरिकांना आवाहन

पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसले आहेत. पोलीस मुख्यालयानं सर्व जिल्ह्यांसाठी हायअलर्ट जारी केला आहे. या तिन्ही दहशतवाद्यांची नावं आणि त्यांचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. बिहारमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांमध्ये बहावलपूरचा मोहम्मद उस्मान, आदिल हुसैन हा उमरकोट येथील आहे. तर हसनैन अली अवान हा रावलपिंडीचा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तिन्ही दहशतवाद्यांच्या पासपोर्टशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे. ते तिघेही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच काठमांडूला पोहोचले होते. तेथून ते बिहारमध्ये घुसल्याचे सांगण्यात आले. या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी म्हणून पोलीस मुख्यालयाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोठ्या हल्ल्याचा कट

बिहारमध्ये घुसखोरी करणारे दहशतवादी हे हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. भागलपूरच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये अररिया, किशनगंज आणि सुपौल हे नेपाळच्या सीमेलगत आहेत. मधुबनी, सीतामढी, पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण हा भाग देखील सीमेलगतच आहे. या जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनाला गुप्तचर यंत्रणा अधिक अलर्ट ठेवण्याच्या सूचनाही पोलीस मुख्यालयातून देण्यात आल्याचे वृत्त आहे.

स्थानिकांना पोलिसांचं आवाहन

संशयित हालचाली किंवा कोणतीही माहिती मिळाली तर तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा हेल्पलाइनवर कळवण्यात यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा संशयित दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. पोलीस मुख्यालयाकडून तिन्ही दहशतवाद्यांचे पासपोर्ट आणि त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच सर्व गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

हे दहशतवादी देशातील विविध भागांत हल्ला करू शकतात, असं गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यात हे राज्य अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाकडून संपूर्ण राज्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि संशयित हालचाली दिसून आल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

3 Jaish-e-Mohammed Terrorists Enter via Nepal
Uri : आदल्या रात्री डझनभर ड्रोन, दुपारी घुसखोरीचा प्रयत्न आणि गोळीबार; जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी उधळला मोठा डाव

नेपाळमार्गे यापूर्वीही पाकिस्तानी आणि पाकिस्तानस्थित संशयित दहशतवाद्यांनी बिहारमध्ये घुसखोरी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला नेपाळ सीमेजवळील भागलपूरच्या बरहपुराचा रहिवासी सद्दाम याला बनावट नोटांसह अटक केली होती. तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती उघड झाली होती. यावर्षी फेब्रुवारीत एनआयएचे पथक सद्दामच्या बरहपुरा येथील घरी धडकले होते. सद्दामच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथून महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

3 Jaish-e-Mohammed Terrorists Enter via Nepal
PM Modi Speech : पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, खुर्ची जाणारच; PM मोदींनी ठणकावलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com