प्रसिद्ध मंदिरात घडली मोठी दुर्घटना; बाल्कनी थेट भाविकांवर कोसळली, अनेक जण गंभीर जखमी

banke bihari lal mandir News : उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराजवळील बाल्कनी थेट भाविकांवर कोसळल्याची घटना घडली.
banke bihari lal mandir
uttar pradesh saam tv
Published On
Summary

प्रसिद्ध मंदिरात घडली मोठी दुर्घटना

मंदिराजवळील घराची बाल्कनी भाविकांवर कोसळली

बाल्कनी कोसळल्याने अनेक भाविक जखमी

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील प्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या गेट नंबर ५ जवळ बाल्कनी कोसळल्याची घटना घडली. हवामानात बदल झाल्याने एका घराची बाल्कनी भाविकांवर कोसळली. या घटनेत दर्शनासाठी आलेले जवळपास ४ ते ५ भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मंदिराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, मथुराच्या बांके बिहारी मंदिराजवळ बाल्कनी कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले. या घटनेनंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, मंदिराजवळील एका खासगी मालकीच्या घराची बाल्कनी कोसळली. बाल्कनीत मोठ्या प्रमाणात व्यक्ती बसले होते. त्यामुळे बाल्कनी कोसळल्याचे बोलले जात आहे.

banke bihari lal mandir
Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

दुर्घटनेत जवळपास ४ ते ६ भाविक गंभीर झाले. भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर मंदिर परिसरात एकच खळबळ माजली. मंदिराजवळ असलेल्या घराची बाल्कनी कमकुवत झाली होती. त्याचवेळी या बाल्कनीवर अनेक लोक बसल्याने कोसळली. दुर्घटनेतील गंभीर जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

banke bihari lal mandir
Pune : पुण्यातील प्रसिद्ध मंदिर परिसरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५० भाविक जखमी

घटना कशी घडली?

प्राथमिक माहितीनुसार, मंदिराजवळ असलेल्या घराची बाल्कनी आधीपासून कमकुवत होती. याच कमकुवत बाल्कनीवर अनेक जण बसले होते. या बसलेल्या लोकांच्या वजनामुळे बाल्कनी कोसळली. ही बाल्कनी खाली उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली. या बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले. स्थानिकांनी तातडीने भाविकांना बाहेर काढलं. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com