Pune : पुण्यातील प्रसिद्ध मंदिर परिसरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५० भाविक जखमी

Pune Bhor News : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत १०० ते १५० भाविक जखमी झाले असून वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
BANESHWAR TEMPLE BEE ATTACK: 150 DEVOTEES INJURED IN BHOR PUNE
BANESHWAR TEMPLE BEE ATTACK: 150 DEVOTEES INJURED IN BHOR PUNESaam tv
Published On
Summary
  • भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांचा हल्ला

  • गेल्या काही महिन्यांत 100 ते 150 भाविक जखमी

  • दुपारी 11 ते 3 या वेळेत हल्ल्यांचे प्रमाण अधिक

  • वनविभागाकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा स्थानिकांचा आरोप

सचिन जाधव, पुणे

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर परिसरात सध्या मधमाशांच्या हल्ल्यांची गंभीर समस्या निर्माण झाली असून भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मंदिर परिसरात अचानक आक्रमक झालेल्या आग्या मधमाशा दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत आहेत. या सततच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत तब्बल १०० ते १५० भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे दुपारी ११ ते ३ या वेळेत उन्हाचा कडाका वाढल्यानंतर मधमाशांचे हल्ले अधिक प्रमाणात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दर्शनासाठी आलेले भाविक, पर्यटक तसेच लहान मुले आणि वृद्ध नागरिक अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे घाबरून सैरावैरा पळताना दिसत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.

BANESHWAR TEMPLE BEE ATTACK: 150 DEVOTEES INJURED IN BHOR PUNE
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर परिसर निसर्गरम्य असून मोठ्या प्रमाणात दाट झाडी आहे. या झाडांवर सुमारे १५ ते २० आग्या मधमाशांची मोठी पोळी असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या मधमाशा अधिक आक्रमक झाल्या असून कोणत्याही क्षणी नागरिकांवर हल्ला करत आहेत. अनेक भाविकांना मधमाशांनी चावा घेतल्याने किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या आहेत.

BANESHWAR TEMPLE BEE ATTACK: 150 DEVOTEES INJURED IN BHOR PUNE
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप केला जात आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मधमाशांची पोळी तातडीने हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com