८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Maharastra Heavy Rain Weather Update Today News : हवामान विभागाने पुढील आठ तासांसाठी १५ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांत ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Maharastra Heavy Rain Weather Update Today News Saam tv
Published On: 

पुन्हा एकदा देशभरातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठ तासांत देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे. या काळात काही भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात. रविवारी महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. बिहारमध्येही रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात हवामान सर्वाधिक सक्रिय राहणार आहे. २७ सप्टेंबर रोजी अनेक भागांत 'अतिमुसळधार' पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीत रविवारी सकाळपासून दुपारच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यासोबतच ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील.

Maharastra Heavy Rain Weather Update Today News
निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

पूर्व राजस्थानमध्ये २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान पाऊस आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळेल. जम्मू-काश्मीरमध्ये २८ आणि २९ सप्टेंबरला वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत पोहोचू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तासांत देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharastra Heavy Rain Weather Update Today News
घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय? रविवारी कुठे कोसळधारा?

रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात विजांसह हलक्या सरीचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com