निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

SIR 2026 claims and objections deadline Maharashtra : SIR 2026 संदर्भात महाराष्ट्र आणि दिल्लीतील मतदारांसाठी मोठी अपडेट; दावे आणि हरकती नोंदवण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याची माहिती. महाराष्ट्रात १२ ऑक्टोबर तर दिल्लीत ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत.
SIR 2026 claims and objections deadline Maharashtra
SIR 2026 claims and objections deadline MaharashtraSaam TV
Published On: 

SIR संदर्भात महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. ज्या मतदारांना नोटिसा मिळाल्या आहेत, त्यांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत; बीएलओ (BLO) स्वतः त्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे गोळा करतील, असा दिलासादायक निर्णयही आयोगाने घेतला आहे.

मतदार यादीतील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत नाव नोंदवणे, दुरुस्ती करणे तसेच दावे आणि हरकती (Claims and Objections) नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने दिल्ली आणि महाराष्ट्रातील मतदारांना मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्रात दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर दिल्लीत ही मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

SIR 2026 claims and objections deadline Maharashtra
दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.

SIR 2026 claims and objections deadline Maharashtra
घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.

SIR 2026 claims and objections deadline Maharashtra
मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

बेघर, मजूर व गरजू नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष

राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com