दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

Eknath Shinde latest announcement : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मदत मिळवण्यासाठी कुठे संपर्क करायचा जाणून घ्या.
Eknath Shinde latest announcement
Eknath Shinde latest announcement Saam TV
Published On: 

दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींचे लग्न ठरलेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यात मुला मुलींच्या लग्नाचा खर्च कसा करायचा याची विवंचना त्यांना कायम सतावत असते. दुष्काळ, नापीकी,कर्ज यामुळे मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करता येणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करून याबाबत चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

Eknath Shinde latest announcement
घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

ज्या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल असे शिंदे यांनी जाहीर केले आहे.

Eknath Shinde latest announcement
मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला होता. त्यानुसार आज राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून थेट दिलासा देण्यासाठी त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाला शक्य ती सारी मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com